Ramraje Naik Nimbalkar : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर राजकीय नेत्यांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर (Ranjit Singh Naik Nimbalkar) जोरदार टीका केली. पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू, असं खुलं आव्हानही रामराजे नाईक निंबाळकरांनी दिलं.
मोठी बातमी! गाझातील मशीदी अन् शाळांवर इस्रायलचा हवाई हल्ला, 24 जण ठार
खटकेवस्ती (ता. फलटण) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी आमदार रामराजे बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, ज्येष्ठ नेते नाईक महादेव पवार यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना रामराजे म्हणाले, तुम्ही अजित पवारांना सोडून चाललाय का, असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. यावर बरीच चर्चा झाली. ही चर्चा दूरवर पसरली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता ते म्हणाले, मात्र ही बातमी विरोधकांनीच दिली असावी. कारण त्यांना असल्या अफवा पसरवण्याची वाईट सवय आहे. जर महायुतीतून रामराजांना बाद केलं, तर कमळाच्या चिन्हावर उभे राहण्यास आम्ही मोकळे असं त्यांना वाटत असेल.
शिर्डीत ‘नारी शक्ती सन्मान’ सोहळा; अजय-अतुलच्या गाण्यांवर सुजय विखे पाटलांचा सपत्नीक ठेका
आमदार रामाराजे म्हणाले की, कार्यकर्ता हा माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. मतदारसंघातील परिस्थिती हाताबाहेर गेली. भाजपचा आधार घेऊन आणि पोलीस प्रशानसनाला बरोबर धरून माझ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्यावर दबाव टाकून खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय. त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. ही परिस्थिती आता सहन करण्यापलीकडे गेली. जर त्यांना निवडणुकीची एवढीच खुमखुमी असेल पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू, असं खुलं आव्हान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिलं.
रामराजे म्हणाले, आपल्या कार्यकर्त्यांवर वारंवार दबाव येत असल्याने आज त्यांच्या भावना तीव्र आहेत. या त्यांचा भावना आपण अजित पवार यांच्यासमोर मांडणार आहोत. ते योग्य तो निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.