Download App

‘राणे साहेब मुख्यमंत्री झाले आपण कायम भावी’, Nitesh Rane यांचा अजित पवारांवर पलटवार

  • Written By: Last Updated:

भाजपचे नेते ( BJP)  नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर ( Ajit Pawar ) निशाणा साधला आहे. राणे साहेब हे मुख्यमंत्री झाले आहेत, आपण मात्र कायम भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरमध्ये अडकले आहात, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे. याआधी अजित पवारांनी नारायण राणेंवर टीका केली होती. राणे साहेबांना एका बाईने पाडले, असे अजितदादा म्हणाले होते. त्यांचा टीका करतानाचा व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विट केला होता. यावरुन नितेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित दादा मोठे नेते आहेत.  पण त्यांना वाचल्या शिवाय जमतच नाही. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले होते.  शाम सावंत् यांना सोडून. बस या वेळी माझा मित्र पार्थ ला निवडून आणा, असा टोला राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.

तसेच गेल्या वेळी  एका साध्या शिवसैनिकाने माझ्या मित्राला पाडले.  राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री आहेत. ते  मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले,  आपण काय फक्त भावी मुख्यमंत्री च्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात, तुमचा आवडता टिल्लू, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

याआधी अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांना एका बाईने विधानसभेला पाडले, असे म्हणत टीका केली होती. त्यांच्या या टिकेचा व्हिडीओ संजय राऊत यांनी देखील ट्विट केला आहे.

Tags

follow us