Raosaheb Danve : माजी गृहज्यमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे वसूले केले जायचे, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, असा आरोप वाझेंनी लेटरबॉम्बमधून केला. हे लेटर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लिहिलं. या आरोपामुळं राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब पडून आहेत, असा इशारा दिला.
पुणे-पिंपरी चिंचवडकरांनो सावध राहा ! हवामान विभागाचा रेडअलर्ट, खडकवासलातून विसर्ग वाढला !
रावसाहेब दानवेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, फडणवीस यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं होतं. समित कदम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर हा सगळा वाद संपायला हवा होता. मात्र राष्ट्रवादीचे नेतेही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करू लागले. फडणवीस यांनी शांत राहण्यास सांगितले होतं. तसंच तुमच्याविरोधात पुरावे आहेत, असंही म्हटलं होतं. आता सचिन वाझेने अनिल देशमुखांचे पीए पैसे घेत होते, असं म्हटलं आहे, असं दानवे म्हणाले.
पैसे कुठे गेले त्याच्या वाटा शोधा…
ईडीने कारवाई करून पैसे अनिल देशमुख यांच्याकडे सापडले नसतील तर पैसे कोणत्या मार्गाने कोणत्या नेत्याजवळ पोहोचले? त्याची चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुख हे मध्यस्थ आहेत, या प्रकऱणाचा कर्ताधर्ता बाहेरचाच आहे. पैसे कुठे गेले त्याच्या वाटा शोधल्या पाहिजेत. सचिन वाझे इतर चौकडीच्या माध्यमातून हा शोध लागला पाहिजे, असं दानवे म्हणाले.
पुढं बोलतांना दानवे म्हणाले, देशमुख यांच्या घराची झडती घेतली, तो पैसा सापडला नाही. याचा अर्थ पैसा आला, घेतला आणि दिला असा निघू शकतो. पैसे आले कुठून? दिले कुणाला हे समोर आलं. पण शेवटी तो गेला कुठं हे नाव गुलदस्त्यात आहे. मला वाटतं हा विषय संपलेला नाही. याला बऱ्याच वाटा फुटणार आहेत. हा फक्त एकच लेटरबॉम्ब होता, आमच्याकडे अनेक लेटरबॉम्ब पडून आहेत, असा इशाराही दानवेंनी दिला.