Download App

सर्वोच्च सभागृहाची मान, शान राखली पाहिजे, रावसाहेब दानवेंचा विरोधकांना टोला

  • Written By: Last Updated:

सध्या देशभरात दोनच गोष्टी चर्चेत आहेत एक म्हणजे IPL आणि दुसरी म्हणजे संसदेच्यात नवीन इमारतीचे उद्घाटन. 28 मे रोजी या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींना डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत असल्यानं विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतेय. या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

राष्ट्रपतींना संसद भवनाच्या इमारतीचे निमंत्रण न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होत असल्याचा निषेध करत बुधवारी 19 बिगर भाजप विरोधी पक्षांनी समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या सोहळ्याबाबतचा वाद अधिकच चिघळला आहे. विरोधी पक्षांनी बुधवारी एक संयुक्त निवेदन जारी करून बहिष्काराची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मोदी सरकार यावर काय निर्णय घेते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

यावर बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतात उद्या नवीन संसदेचे उद्घाटन आहे. कुठल्या तरी मुद्द्यावर वाद तयार करून चर्चा घडवून आणणे बरोबर नाही. हे देशाचे सर्वोच्चसभागृह आहे. या सभागृहाचा मान शान राखला पाहिजे. उगीचचं अशा या चांगल्या कार्यक्रमाला वाईट बोलणं किंवा विरोध करणे विरोधी पक्षाला शोभत नाही.

Nana Patole यांची उचलबांगडी निश्चित : काँग्रेसचे 2 ‘चाणक्य’ प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत

यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले नवी इमारत बांधणे हे आम्ही वर्तमान पत्रात वाचले. नंतर भूमिपूजन झालं तेव्हाही आमंत्रण नाही. विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते. म्हणून बहिष्कार घालण्याचा निर्णय काहींनी घेतला तो आम्हाला मान्य आहे.

 

 

Tags

follow us