Video : “मोहित कंबोज पहाटे 3.30 ला मुलींसोबत…” व्हिडीओ शेअर करत राऊत आक्रमक; फडणवीसांना म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला आहे. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. संजय राऊत यांनी शेअर केलेलय व्हिडीओमध्ये सचिन कांबळे मोहित […]

Brij Bhushan Sharan Singh

Brij Bhushan Sharan Singh

देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला आहे. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.

संजय राऊत यांनी शेअर केलेलय व्हिडीओमध्ये सचिन कांबळे मोहित कंबोज यांच्याबाबत दावा करत आहेत. “लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे देवेंद्र फडणवीस यांचे खास मोहित कंबोज मुलींना घेऊन नाचत आहेत, धिंगाणा घालत आहेत. बेधुंद अवस्थेत, नशा करून ते मुलींसोबत नाचत आहेत” असा दावा कांबळे यांनी या व्हिडीओ मध्ये केला आहे.

याच व्हिडिओमध्ये ते पुढे असं म्हणतात की, “आमच्या सभा साडेदहा वाजताच बंद करता आणि मग यांना साडेतीन वाजेपर्यंत मुलीसोबत कसे नाचू शकतात”, असा थेट सवालही कांबळे यावेळी विचारत आहेत.

मी भुजबळांना घाबरत नाही, त्यांनी माझ्यासमोर निवडणुकीला उभं राहाव; कांदेंचं थेट आव्हान

यासोबत राऊत यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्याच ते म्हणतात  “महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवट पर्यंत पहा. पोलिस हतबल आहेत..हे तर काहीच नाही.” असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी या ट्विटसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात काही लोक पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहेत.

काल संजय राऊत यांनी एका हॉटेलमधल्या व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे की, “पहाटे 3.30… महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवट पर्यंत पहा.पोलिस हतबल आहेत..हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे.. मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत.. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे.”

Shinde VS Thackery : ‘वज्रमूठ’ सभेपुर्वी शिवसेनेचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का, ‘या’ खासदाराचे निकटवर्तीय शिवसेनेत

Exit mobile version