पुणे : कसबा( Kasaba ) पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. दरम्यान यानंतर धंगेकरांनी रासनेंना खोचक टोला लगावला आहे.
कसब्यामधील पराभवानंतर भाजपची चिंतन बैठक पार पडली. याबैठकीत भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी ज्या भाजपमधील लोकांनी धंगेकरांना मदत केली त्यांच्याकडे बघणार, असा इशारा दिल्याची माहिती आहे. यावरुन धंगेकर यांनी रासनेंना खोचक टोला लगावला आहे. ते फक्त बघतच असतात, असे ते म्हणाले आहेत.
…असा नशा करण्यापेक्षा भक्ती, कामाचा करा; फडणवीस अर्थसंकल्पात ‘रंग’ आणणार
रासने हे कधीच हसत नाहीत, कायम बघतच असतात. ते कधी कुणाकडे पाहून हसत देखील नाही, व हात पण दाखवत नाहीत, कायम बघतच असतात, अशा खोचक शब्दात धंगेकरांनी रासनेंना टोला लगावला आहे. रासने यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत स्वपक्षातीलच काही नेत्यांवर आगपाखड केल्याची माहिती आहे. आगामी काळात त्यांच्याकडे पाहणार, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा गड असलेल्या कसबा विधानसभा क्षेत्रात विजय मिळवला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा गेली २५ वर्षांपेक्षा अधिक काळ भाजपकडे होता. याठिकाणी धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. यानंतर राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले आहेत, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केले आहे.
Eknath Shinde : कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी साजरी केली धुळवड..
शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. मी उमेदवारी अर्ज भरल्यावर ते स्वत: प्रचारासाठी आले. त्यांनी तीन-चार सभा घेतल्या. त्यांच्या सभेमुळे कसबा विधानसभेत त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो ताकदीने माझ्या मागे उभा राहिला. माझ्या विजयात त्यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राचे ते सह्याद्री आहेत, असे धंगेकर म्हणाले आहेत.