Eknath Shinde : कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी साजरी केली धुळवड..

Eknath Shinde : कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी साजरी केली धुळवड..

Eknath Shinde : देशभरात आज धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळून या सणाचा आनंद द्विगुणित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आपल्या ठाणे येथील राहत्या घरी धुळवडीचा आनंद घेतला. नातू रुद्रांशकडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला.

धुलीवंदनाचा निमित्ताने ठाणे (Thane) येथील शुभ दीप या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कुटूंबियांच्या तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवासोबत रंगपंचमीचा सण साजरा केला.

वाचा : Sushma Andhare : एकनाथ शिंदे फक्त कळसुत्री बाहुली, फडणवीस खरे सूत्रधार 

राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुलीवंदनाचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन करून त्यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसोबत रंग खेळले तसेच त्यांना गोड देखील खाऊ घातले. या निमित्त त्यांनी राज्यातील जनतेला होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छाही दिल्या.

ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक; फडणवीसांकडून शिंदेंना बळ

राज्यात कालपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार सर्वसामान्य ठामपणे उभे असून त्यांना लागेल ती सर्व मदत केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube