Download App

“पुणे आणि परिसराच्या विकासात उल्लेखनीय योगदान…” आमदार जगताप यांच्या परिवाराला मोदींचे पत्र

  • Written By: Last Updated:

पुणे : “सहज आणि सरळ व्यक्तिमत्त्वाचे लक्ष्मणभाऊ जमिनीशी जुळलेले नेते होते. ते लोककल्याणासाठी सदैव समर्पित राहिले. पुणे आणि आसपासच्या परिसराच्या विकासात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेसाठी लोक त्यांना नेहमीच स्मरणात ठेवतील.” अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयाचे सांत्वन केले आहे.

पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. पंतप्रधान मोदी यांनी जगताप कुटुंबियांना पत्र पाठवून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे पत्र

पंतप्रधान मोदी यांनी पत्रात काय म्हटले आहे ?

लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अतीव दुःख झाले. या कठीण काळात माझ्या संवेदना जगताप कुटुंबियांसोबत आहेत. सहज आणि सरळ व्यक्तिमत्त्वाचे लक्ष्मणभाऊ जमिनीशी जुळलेले नेते होते.

ते लोककल्याणासाठी सदैव समर्पित राहिले. पुणे आणि आसपासच्या परिसराच्या विकासात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेसाठी लोक त्यांना नेहमीच स्मरणात ठेवतील. त्यांच्या निधनाने भाजपा आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

लक्ष्मण जगताप हे आपल्या परिवारासाठी मजबूत आधार आणि प्रेरणास्रोत होते. ते आज या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांची जीवनमुल्ये जगताप कुटुंबासोबत कायम राहतील.

Tags

follow us