Supriya Sule On Devendra Fadnavis Resign Demand: महाराष्ट्रातील सुरू असलेल्या सध्याच्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपलं मत व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे. जालन्यात अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. तसंच, पुण्यात कोयता गँग सक्रीय आहे. ड्रग्ज माफियांचं साम्राज्य या राज्यात आहे. इतकचं काय तर राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत हे समाज आरक्षणाची मागणी (Maratha Reservation) करत आहेत. त्यांना आरक्षण दिलं जात नाही. महाराष्ट्र आज पेटला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे गृहखात्याचं अपयश असल्यानं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तातडीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा राजीनाा घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी मागणी केली आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यादेखील उपस्थित असून आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून लक्षवेधी आंदोलन केले. मराठा समाजास आरक्षण देण्याच्या दृष्टीने, तात्काळ एकदिवसीय अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, शिवसेना आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना आमदार विलास पोतनीस, शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर व शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील सगळ्या परिस्थितीसाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आणि आरक्षणासाठी ४० दिवस सांगून सरकारने जरांगे पाटलांची फसवणूक केली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पुण्यातील नवले पुलाजवळ मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. ही परिस्थिती पाहून सुप्रिया सुळेंनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नवले पुलाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे. त्यासाठी मी सर्वांना शांततेचं आवाहन करेन. राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अपयश आहे. आताच नाही तर जालन्याच्या घटनेपासून हे सुरू आहे. जालना, बीड नंतर ड्रग्स, प्रकरणदेखील समोर आलं आहे. मात्र हे सरकार ईडी, सीबीआय, पक्ष फोडणे, घरं फोडण्यात व्यस्त आहे. सामान्यांसाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकारला वेळ नाही आहे. सरकारने जरांगे पाटलांना ४० दिवस सांगून जरांगे पाटलांची फसवणूक केली.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय ठरलं?
जरांगे पाटील म्हणाले ते बरोबर आहे .जरांगे पाटलांनासोबत जसा त्यांनी दगा फटका केला तसा सगळ्यांसोबत केला आहे या राज्यातल्या महिला सुरक्षित कुठे आहे. मराठा समाज, धनगर समाज,लिंगायत समाज, मुस्लिम समाज सगळ्यांना धोका दिला आहे. आज कोण सुरक्षित आहे असा जाब सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे. या सर्वाला पूर्णपणे जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत ते सातत्याने खोटं बोलतात कालच एका वकिलाचं पूर्णपणे स्पष्टीकरण आले ते काय म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर आम्ही त्यांना एमएलसी ( MLC) करू राजीनामा दिला म्हणजे यांना माहित आहे याचा अर्थ की डिस्क कॉलिफिकेशन होणारे म्हणजे त्यांच्यासोबत देखील त्यांनी दगा केला. भाजपा आता शिंदेंसोबत देखील दगा फटका करत आहेत माझी या अजित पवार गटाला ही विनम्र विनंती आहे की कधीतरी एका ताटात जेवलो आहेत आपण ते आता शिंदेंना पण धोका देत आहे त्याच्यामुळे तुम्ही ही भाजपापासून सांभाळून राहा. असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला दिला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गृहमंत्री काय करताय दुसऱ्या राज्यात जातात प्रचाराला दुसऱ्या राज्यात प्रचाराला जायला वेळ आहे. पण राज्याची सुरक्षितता यासाठी वेळ नाही गृहमंत्र्याला मी गेले अनेक दिवस ही मागणी करत आहेत ते वेळ काढू पणाकरत आहेत, त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे त्याच्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मराठा आंदोलनाच्या हिंसाचारावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्या पद्धतीने सोळंकींच्या घरावर कुटुंबावर हल्ला झाला संदीप क्षीरसागरची लहान लहान मुलं त्याच्या बायकोशी मी बोलले बिचारी ती बोलताना थरथर कापत होती फोनवर तिला बोलता येत नव्हतं. राज्यात भारतीय जनता पक्ष मताच राजकारण करत आहेत. पण माणुसकी आम्ही नाही विसरलो आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत राजकारण एका बाजूला माणुसकी पहिले आहे. छत्रपतींचे नाव घेऊन तुम्ही राजकारण समाजकारण करताना शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेताना मग माणुसकी कुठे गेली या भारतीय जनता पक्षाची माणुसकी असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.