मुंबईः काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांच्यामधील वाद उफाळला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. थोरातांनी वाढदिवसाच्या दिवशीच प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले यांना राजीनामा देऊन एक रिटर्न गिफ्ट दिले असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद झाला आहे. त्यात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केली. तांबे हे निवडून आल्यानंतर त्यांनी नाना पटोले यांच्यावर पुराव्यासह आरोप केले होते. पदवीधर निवडणुकी दरम्यान थोरात यांनी मौन बाळगले होते. थोरात हे मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. तांबे हे निवडून आल्यानंतर थोरात यांनी मौन सोडले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले होते. थोरात व तांबे यांना कसे बदनाम केले गेले हेच थोरात यांनी सांगितले. तसेच पटोलेंची पक्षश्रेष्ठीला पत्र लिहून तक्रारही थोरातांनी केली. पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही, असे पत्रात म्हटले आहे.
थोरात यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. या दिवशीच बाळासाहेब थोरात यांनी पक्षाचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पटोले यांच्यासाठी हा एक मोठा झटका आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणात थोरात यांनी नाना पटोले यांना आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच एक जोरदार रिटर्न गिफ्ट दिले आहे.थोरात हे काँग्रेसमधील संयमी नेते म्हणून मानले जातात. अनेकदा किती राजकीय संकटे असे, आरोपांना ते संयमाने उत्तरे देतात. परंतु आता ते जास्तच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
Balasaheb Thorat यांनी राजीनामा दिला का ? नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया ही बातमीही वाचा
या गिफ्टवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यात नाना पटोले हे मवाळ भूमिका घेताना दिसत आहे. मी सर्वप्रथम बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो.आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही. ते आमचे नेते आहेत. गैरसमज झाला असेल तर आम्ही त्यावर बोलू. मी काँग्रेसचा आमदार आहे आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आहेत. त्यामुळे ते आमचे नेते असून नेत्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. १५ फेब्रुवारी रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. पटोले यांनी मावळ भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.