Radhakrishna Vikhe on Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार जुंपली आहे. त्यावरून महाविकास आघाडीचे नेते व भाजप-शिवसेनेचे नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. त्यात आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडी घेतली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या विखे यांनी शरद पवारांना डिवचणारी टीका केली आहे.
मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन आता मोर्चा काढताहेत; CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
विखे म्हणाले, शरद पवार व त्यांच्या पक्षाची नेत्यांची व्यक्तव्य हे बार्गेनिंग पॉवर वाढविण्यासाठी केली जातात. या व्यक्तव्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. राष्ट्रवादी पक्ष तळ्यात-मळ्यातील पक्ष आहे. या पक्षातील नेते दिवसा एक बोलतात. रात्री अनेकांच्या गाठीभेटी घेतात. या वागण्यामुळे या पक्षाची विश्वासार्हता कमी होत आहे.
गुगली नक्की कोणाची? विकेट कुणाची ? पवार आणि फडणवीस पुन्हा भिडले !
पवारांबरोबर विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फक्त फेसबुकवर दिसले. उलट त्यांच्या काळात राज्याची अधोगती झाल्याची टीकाही विखे यांनी केली आहे.
याचबरोबर विखे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनीही एक सवाल उपस्थित केला आहे. काही दिवसांपापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा होतात. कोणत्या बदलीला किती पैसे घेतले जातात याचे रेटकार्ड काढले होते.
Eknath Shinde : माझं धाडस अन् फडणवीसांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री; सत्तास्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त शिंदेंचं भाषण
त्यावर विखे म्हणाले, महसूल विभागातील बदल्यांबाबत पैसे घेतले जातात. हे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दाखवून द्यावे, यावर तात्काळ कारवाई केली जाईल मात्र ऊस आंदोलन सोडून राजू शेट्टी महसूल आंदोलनाकडे कसे वळले, असा सवालही विखे यांनी उपस्थित केला आहे.