मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन आता मोर्चा काढताहेत; CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन आता मोर्चा काढताहेत; CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde on uddhav thackeray : काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली. ठाकरे गटाशी संबंधित पालिका अधिकारी आणि नेत्यांच्या घरावर छापेमारी झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरातील विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर उद्या १ जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, अन् आता उलटा चोर कोतवाल को डांटे, अशी त्यांची अवस्था असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. (Eknath Shinde slams uddhav thackeray and ubt shivsena over 1 July morcha)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वर्षपुर्तिनिमित्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलतांना सीएम शिंदे म्हणाले, खरंतर मोर्चा कुणी कुणावर काढावयाच हा प्रश्न आहे. ज्यांची 20-25 वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता होती, त्यांनी महानगरपालिकेला ओरबडून काढलं, मुंबईची लुट केली अन् आपली घरं भरली. मुंबईकरांना सुविधांपासून वंचित ठेवलं. कोविडमध्ये माणसं मरणं होती आणि इकडं काही माणसं कोविडच्या नावाखाली पैसे लुटत होते. वैद्यकिय सोयी-सुविधांमध्ये भ्रष्टाचार करणं यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? असं म्हणत त्यांनी भ्रष्ट्राचाराचा उच्चांक गाठला. मयताच्या टाळूवरचं लोणी खायचं काम त्यांनी केलं. तेच लोक आता आम्हाला प्रश्न करत आहेत, हे म्हणजे, उलटा चोर कोतवाल को डांटे, अशी टीका शिंदेंनी केली.

शिंदे आणि फडणवीस यांच्या नावावर आणखी एक विक्रम : समित्यांचे उदंड पीक 

शिंदे म्हणाले, आमचे सरकार आल्यावर मुंबईतील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 15 र्षांपूर्वी घेतला असता तर मुंबई महापालिकेचे 3500 कोटी रुपये वाचले असते. वेळेवर निर्णय न घेतल्याने मुंबईकरांना वर्षानुवर्षे खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागला, त्यामुळं विविध अपघात लोकांचे बळी गेले. मागील सरकारच्या काळात अडीच वर्षांत मेट्रो आणि कारशेड प्रकल्प पूर्णपणे रखडले होते. रस्त्याचे कामं, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशी विविध लोकाभिमुख कामे पूर्ण व्हायला हवी होती. मात्र संधी असतानाही ही कामे झाली नाहीत. कोरोनात मुंबईत अनेकांचे मृत्यू झाले. याला सदोष यंत्रणा जबाबदार आहे, हे लवकरच जनतेसमोर येईल. म्हणून हे यावरचं लक्ष हटवण्यासासाठी हा मोर्चा आहे. पण जनता या नाटकीपणाला फसणार नाही, असं शिंदे म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube