Download App

संभाजीनगरमधील दंगल पूर्वनियोजित होती, असं म्हणणाऱ्यांनी काय केलं? दानवेंचा फडणवीसांना सवाल

  • Written By: Last Updated:

Riots in Sambhajinagar Premeditated; But what did those who said that the riots were planned? : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) रामनवमीच्या आधल्या दिवशी रात्री दोन गटात राडा झाला होता. शहरातील किराडपुरा भागात दोन गट एकमेकांना भिडले होते. या दंगलीवरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर कायम आरोप-प्रत्यारोप करत असतात. या दंगलीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मोठा आरोप केला होता. या दंगलीच्या घटनेमागे भाजप आणि एमआयअमचा हात असून त्यांना फक्त दंगली हव्यात असं वक्तव्य दानवेंनी केलं होतं. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांनी ही दंगल पूर्वनियोजीत होती, असा खळबळजनक दावा केला होता. त्यावरून आता पुन्हा एकदा दानवेंनी या दंगलीबाबत मोठं विधान करत फडणवीसांवर निशाणा साधला. दंगल पूर्वनियोजित होती, असे म्हणणाऱ्यांनी काय केले, असा सवाल त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. यानंतर छत्रपती संभाजीनगरच वातावरण चांगलचं पेटलं होतं. औरंगाबादच नाव बदलल्याने एमआयएमने संभाजीनगरमध्ये मोठं आदोलन केलं होतं. त्यानंतर रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात भीषण दंगल झाली होती. श्रीराम मंदिरासमोरच दोन गट एकमेकांना भिडले होते. दरम्यान, गृहमंत्री फडणवीस यांनी ही दंगल पूर्वनियोजित होती, असं सांगिलतं. आज यावर बोलतांना अंबादास दानवे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस खात्यावर गंभीर आरोप केले आहेत. संभाजीनगरमधील दंगली ही पूर्वनियोजित होती, असं काहीचं म्हणणं आहे. पण, संभाजीनगरमधील दंगल ही पर्वनियोजित होती, असं म्हणणाऱ्यांनी काय केलं, असा सवाल त्यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते. दानवे म्हणाले की, ही दंगल पूर्वनियोजित होती, हे खरं आहे. ही दंगल होण्याआधी एका महिन्यापासून मी पोलीस आयुक्तांना भेटून शहरात दंगली होणार आहेत, असं सांगितलं होतं. दंगल होण्याच्या चार दिवस आधीही मी आयुक्तांना बोललो होता. दंगल होण्याच्या एक दिवस आधीही मी पोलीस आयुक्तांना बोललो होता. रोज त्या भागात काही ना काही होतं असे, असं सांगितलं.

सतेज पाटील हे 96 कुळी पाटील नव्हे तर मनोरुग्ण पाटील… महाडिकांची टीका

गृहमंत्री फडणवीस यांनी ही दंगल पूर्वनियोति होती, हे ठाऊक होतं, तर गृहखात काय करत होतं. पोलीस आयुक्त काय करत होते? पोलीस आयुक्तांनी ही दंगल उधळून का लावली नाही? दंगलीच्या ठिकाणी पोलीस आयुक्त उशीरा का पोहोचले? पोलीस आयुक्तांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे आलेले फोन का उचलले नाहीत? असे सवाल दानवेंनी उपस्थित केले.

दानवे म्हणाले की, दंगल आटोक्यात आणण्यासाठी 2 ते 3 तास घेतले. व महिला पोलिसांना फायरिंग करावी लागली, पुरुष पोलीस अधिकारी मात्र आयुक्तांच्या सोबत होते. त्यामुळं संभाजीनगरचे पोलीस देखील या दंगलीला जबाबदार आहेत. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल ठरलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून दंगलीचे प्रयत्न सुरू होते, दंगल पूर्वनियोजित होती, तर हे समोर यायला पाहिजे, असं दानवे म्हणाले.

Tags

follow us