Download App

‘कर्जत येथील नीरव मोदीची जमीन ही…’; रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar On Ram Shinde :  कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून कर्जत येथे एमआयडीसी व्हावी, यासाठी आक्रमक झालेत. यानंतर भाजपचे आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना संबंधित जमीन ही नीरव मोदी नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती दिली होती. त्यावर आता रोहित पवारांनी अधिकची माहिती दिली आहे.

दिल्लीच्या ‘आका’साठीच दोन दिवस अधिवेशनाला सुट्टी? नाना पटोलेंनी कोंडीतच पकडलं…

रोहित पवार म्हणाले की,  ED ने 2018 ला नीरव मोदींची जमीन ताब्यात घेतली आहे. 2018 मध्ये मी आमदार नव्हतो. 2014-18 मध्ये जेव्हा त्यांनी जमीन विकत घेतली तेव्हाही मी आमदार नव्हतो. त्यामुळे त्यांना कोणी कोणी मदत केली हे पाहणं गरजच आहे, असे म्हणत त्यांनी राम शिंदेंच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. राम शिंदे यासंबंधीची माहिती दिल्यानंतर रोहित पवार हे अडचणीत आल्याचे बोलले जात होते. तसेच ही नीरव मोदी नामक व्यक्ती परदेशात पळून गेलेली आहे की दुसरी कोणी याबाबत तपास करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितले.

संभाजी भिडेचा तत्काळ बंदोबस्त करा; ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांचा संताप

तसेच यावेळी रोहित पवारांनी राम शिंदेवर निशाणा साधला. ते म्हणाले की ,राम शिंदे हे 10 वर्ष आमदार त्यातली 5 वर्ष कॅबिनेट मंत्री असूनही त्यांनी काहीही विकास केलेला नाही. तसेच आज योगायोगाने माझ्या मतदार संघातील 25,000 नागरिकांच्या सह्यांची पत्रे तुमच्या समोर उद्योगमंत्री यांना दिली. युवांचा वतीने, फक्त माझ्या मतदार संघातील नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील युवक उदय सामंत यांच्याकडे आशा लावून आहेत. आता 25,200 लोकांनी सह्या केल्यात. यांनी जर मुंबईमध्ये यायचं ठरलं तर, लाखो युवक महाराष्ट्रातून येतील, असे म्हणत त्यांनी उद्योगमंत्र्यांनाही इशारा दिला.

 

Tags

follow us