Download App

मतदारसंघात येऊन जे करायचं ते करा; रोहित पवारांचं भुजबळांना खुलं आव्हान

Rohit Pawar On Chagan Bhujbal : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group)आमदार रोहित पवार यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली. भुजबळ म्हणाले आपण पहिल्यांदा जेव्हा मुंबईचे महापौर(Mumbai Mayor) होतो, त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार (Rohit Pawar)यांचा जन्म झाला. त्याचबरोबर रोहित पवारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी थेट कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येऊन योग्य उत्तर देणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यावर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघात मोठी ताकद लावली जाणार आहे, हे मला माहित आहे. मात्र जोपर्यंत माझा विश्वास माझ्या मतदारसंघातील मतदारांवर आहे, आणि मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी कोणालाही घाबरत नाही, असा थेट इशाराच मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे.(Rohit Pawar criticise on Chagan Bhujbal ncp Karjat Jamkhed Assembly Constituency)

राजू शेट्टींच्या मुलाची वरात ट्रॅक्टरवरून विवाहस्थळी दाखल, पाहा फोटो

रोहित पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांचा जो काही मोठा राजकीय अनुभव आहे, त्यातला मोठा काळ त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घालवला आहे. शरद पवार यांच्याबरोबर घालवला आहे. त्याच पक्षामध्ये पवार साहेबांबरोबर मी आहे. त्यामुळे त्यांना माझ्याविषयी बोलण्याचा अधिकार आहे.

“पांडुरंगाच्या सेवेचं फळ मिळालं…” : अजितदादांच्या आईनं पंढरपूरमध्ये जाऊन घेतलं दर्शन

आपण जी भूमिका मांडली, ती लोकांची भूमिका मांडली, त्यात माझंही मत आहे. ती भूमिका मांडत असताना मी एवढंच बोललो होतो की, साहेबांनी आपल्याला एवढं सहकार्य केलं, तर कमी काय केलं? तर ठिक आहे, त्यांना त्याच्याबद्दल जे काही वाटलं ते वाटलं, त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही.

माझी लायकी कुणी ठरवायची तर मला असं वाटतं की, ती माझ्या मतदारांनी ठरवावी असं माझं प्रामाणिक मत आहे. जो शाहु, फुले, आंबेडकरांचा विचार जो पवारसाहेबांनी जोपासला, जो पुढे घेऊन गेले. पवारसाहेबांबरोबर आज जे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, मी जर चुकलो तर त्यांनी माझी लायकी काढावी, कारण ते विचारसरणीला प्रामाणिक आहेत. माझ्याकडून त्या विचारसरणीत जर चूक झाली तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला तो हक्क आहे, माझ्याविरोधात बोलण्याचा.

राहिला प्रश्न माझ्या मतदारसंघात येण्याचा तर माझ्या मतदारसंघात अनेक लोकं येणार आहेत. भाजपाचे पण येणार आहेत. भुजबळसाहेब येतील, तटकरे येतील, अनेक नेते येतील पण माझा विश्वास माझ्या मतदारांवर आहे. फोडाफोडी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणीही केला जाईल. पण जोपर्यंत माझा विश्वास माझ्या मतदारांवर आणि त्यांचा माझ्यावर आहे, तोपर्यंत मी कोणालाही घाबरत नाही, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. राहिला प्रश्न पदाचा तर पदाचा विचार केला असता तर मी त्यांच्यासोबत गेलो असतो, असेही पवार म्हणाले.

Tags

follow us