इतर पक्षांमुळे मंत्री झाले, काहीतरी स्टॅंन्डर्ड पाहिजे; सदाभाऊंच्या पवारांवरील वक्तव्यावर खडसेंनी सुनावले
Eknath Khadase : सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, सध्यातरी राज्यात कुणी काय बोलावं याचं बंधन राहिलेलं नाही. कुणी सैतान म्हणतं, कुणी पप्पू म्हणतं तर कुणी काही म्हणतं. राजकारणातच स्तर इतका खाली गेला आहे की, या लोकांविषयी जनमानसामध्ये चीड आणि किळस निर्माण झाली आहे. काहीतरी स्टॅंन्डर्ड असला पाहिजे. शब्दांचा वापर नीट जपून केला पाहिजे. बहुतांश पक्षांची भूमिका आता अशीच दिसते आहे की त्यांनी त्यांचा दर्जा सोडूनच दिलेला दिसतोय. अशी टीका खडसे यांनी केला आहे. ( Eknath Khadase Criticize Sadabhau Khot for Statement about Sharad Pawar )
‘माझ्या पुतण्याने सांगितल्यास त्याक्षणी घरी बसेल’; भुजबळांचा पवारांना टोला
पुढे खडसे असं म्हणाले की, शरद पवार यांचा राजकीय जीवन आणि उंची लक्षात घेता त्यामुळे असे शब्द वापरणे योग्य नाही. सदाभाऊ खोत हे इतर पक्षांसोबत गेल्यानंतर मंत्री झाले मात्र शरद पवार यांनी अनेकांना मंत्री केलं. त्यामुळे अशा पद्धतीचे शब्द उच्चारणे योग्य नाही त्याचा मी निषेध करतो. असं देखील खडसे म्हणाले.
PM मोदींना थेट गुजरातमध्ये जाऊन भिडणारा नेता आता संसदेत दिसणार! कोण आहे साकेत गोखले?
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी केलेलं बंड हे शरद पवारांनी केलेलं पाप आहे. तेच आता त्यांना अशा प्रकारे फेडावं लागत आहे. तर हा सैतान पुन्हा गावगाड्यामध्ये येता कामा नये. यासाठी आम्ही कार्यकर्ते काम करणार आहोत. त्यांनी नवे सरदार उभे करता कामा नये. गावगाड्याला ही लढाई लढावी लागणार आहे.
पुढे सदाभाऊ खोत असंही म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी हा गवताचा भारा विस्कटवलेला आहे. त्या पेंड्या आता दाही दिशाला झालेल्या आहेत. आता या पेंड्यांच्या काड्या काही दिवसांमध्ये होतील. त्या निश्चितपणे मोडल्याही जातील. तर हे ऐतिहासिक काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. अशी टीका रयत क्रांतिचे सदाभाऊ खेत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली होती.