PM मोदींना थेट गुजरातमध्ये जाऊन भिडणारा नेता आता संसदेत दिसणार! कोण आहे साकेत गोखले?

PM मोदींना थेट गुजरातमध्ये जाऊन भिडणारा नेता आता संसदेत दिसणार! कोण आहे साकेत गोखले?

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट गुजरातमध्ये जाऊन भिडणारा नेता आता संसदेत दिसणार आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) साकेत गोखले (Saket Gokhale) यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. साकेत गोखले यांच्यासोबतच डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुखेंदू शेखर रे, समीरुल इस्लाम आणि प्रकाश चिक बराक यांनाही राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यापैकी डेरेक ओब्रायन, सुखेंदूर शेखर रे आणि डोला सेन हे आधीच राज्यसभेचे सदस्य आहेत. डेरेक ओब्रायन हे राज्यसभेतील टीएमसीचे नेते आहेत. (Trinamool Congress has announced Saket Gokhale as a candidate for Rajya Sabha)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट भिडणारा नेता :

तृणमूलचे प्रवक्ते असलेल्या साकेत गोखले यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. साकेत यांना गुजरात पोलिसांनी जयपूर येथून अटक केली होती. गुजरातमधील मोरबी दुर्घटनेबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींशी संबंधित बनावट ट्विट केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर क्राऊड फंडिंगच्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणीही त्यांना अटकही झाली होती. अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगच्या आरोप त्यांच्यावर केला होता.

काका-पुतणे येणार एकाच मंचावर; PM मोदी, CM शिंदेंच्या उपस्थितीत होणार भेट

मेघालय सरकारनेही साकेत गोखले यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. मेघालयातील एका पर्यटन प्रकल्पात 632 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप साकेत यांनी केला होता.

3 वर्षांपूर्वी साकेत गोखले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात रामजन्मभूमी मंदिराचा पायाभरणी सोहळ्याविरोधात याचिका दाखल केली होती. अनलॉक 2.0 ची मार्गदर्शक तत्वे आणि कोरोनाच्या काळात जनतेचे आरोग्य लक्षात घेऊन अयोध्येत राम मंदिराच्या आयोजनावर बंदी घालण्याची मागणी गोखले यांनी केली होती. त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी केली होती.

कोण आहेत साकेत गोखले?

मुळेच आरटीआय कार्यकर्ते असलेले साकेत गोखले ऑगस्ट 2021 मध्ये TMC मध्ये सामील झाले होते. याआधी त्यांनी माध्यमांमध्येही काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट भिडणारा नेता म्हणून साकेत गोखले यांना ओळखले जाते.

ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही, रामदास कदमांनी पुन्हा डिवचलं…

गोखले यांनी आतापर्यंत पेगासस स्पायवेअर, बँक लोन आणि तुकडे तुकडे गँग यासह विविध प्रकरणांमध्ये आरटीआय दाखल केला होता. तृणमूल काँग्रेसच्या आधी त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं आहे. राहुल गांधींचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता, असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube