‘गाडीने उडवू’, भाजप महिला नेत्याला धमकावलं; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षासह आठ जणांवर गुन्हा

मोरे यांचे नाव प्राथमिक एफआयरमधून वगळण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर पोलिसांनी मंगळवारी मोरे यांचेसह अन्य सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

  • Written By: Published:
News Photo   2025 10 29T145050.176

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. (Pune) भाजप महिला मोर्चाच्या राज्य सचिव असलेल्या ३६ वर्षीय महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह आठ जणांविरुद्ध धमकी आणि मारहाणीची तक्रार चिंचवड पोलिसांकडे दाखल केली आहे. सुरुवातीला अनुप मोरे यांचे नाव प्राथमिक एफआयरमधून वगळण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर पोलिसांनी मंगळवारी मोरे यांचेसह अन्य सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

एका मित्राच्या बंगल्यावर गेले असता बंगल्याबाहेर जमलेल्या अनुप मोरे यांच्या समर्थकांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. इतकेच नाही तर मला पोलिसांसमोरही मारहाण करण्यात आली, असं तेजस्विनी कदम यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अनुप मोरे यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आला. मात्र, अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

सात अधिकाऱ्यांच्या बदल्या; आरोग्य, पाणीपुरवठा विभागात बदल, तर पुणे महानगरपालिकेत पवनीत कौर

आपल्या विरोधात सर्व गोष्टी अनुप मोरे हाच करत असून गुन्हात त्याचे नाव का नाही? आणि त्याच्यावर गुन्हा दाखल का नाही? असा प्रश्न तेजस्विनी कदम यांनी उपस्थित करत पोलिसांना जाब विचारला. त्यावेळी अनुप मोरे यांचे नाव घ्यायचे राहिल्याचे सांगत दुसऱ्या दिवशी अखेर अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस्विनी कदम यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.अनुप मोरे आणि तेजस्विनी कदम यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे जाहीर आहे. मात्र, अचानक असं काय झालं की, दोघांमधील वाद इतका टोकाला गेला यावरून विविध चर्चा सुरू आहे.

आपण घटनास्थळी नव्हतो, बदनामी करण्याच्या हेतुने आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे मोरे यांनी म्हटलं असून आरोप खोटे असल्याचे म्हटले. दोघांनाही पक्षातील वरिष्ठांशी बोलून आपली बाजू माध्यमासमोर मांडू असे म्हटल्याची माहिती मिळतीय. तेजस्विनी कदम काही वर्षांपासून राजकारणात आणि भाजपात सक्रिय आहेत. अनुप मोरे भाजपाचे कट्टर कार्यकर्त्ये असून त्यांच्या आई पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका आहेत.

follow us