सात अधिकाऱ्यांच्या बदल्या; आरोग्य, पाणीपुरवठा विभागात बदल, तर पुणे महानगरपालिकेत पवनीत कौर

IAS officer transfer: पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, यशदाचे उपमहासंचालक यांच्याही बदल्याही झाल्या आहेत.

  • Written By: Published:
seven-ias-officer-transfer-pune-mumbai

IAS officer transfer: सरकारने प्रशासकीय पातळीवर फेरबदल केले आहेत. राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांची (IAS officer transfer) बदली करण्यात आली आहे. यात अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, यशदाचे उपमहासंचालक यांच्याही बदल्याही झाल्या आहेत. काही विभागाचे सचिवही बदलण्यात आले आहेत.


शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेची चौकशी करण्याचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खांदरे यांची पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञानचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया यांची खांदरे यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. तर कुणाल कुमार यांची शिवशाही पुर्नवसन प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंग यांची माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. तर जलजीवन मिशन (नवी मुंबई) चे मिशन संचालक ई रवीनधिरन यांच्यावर सार्वजनिक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. ( seven-ias-officer-transfer-pune-mumbai)

एकट्यानेच अर्धा संघ तंबूत पाठवला! रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात शमीची वादळी गोलंदाजी


पवनीत कौर पुणे महानगरपालिकेत

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन (𝐌. 𝐉. 𝐏𝐫𝐚𝐝𝐞𝐞𝐩 𝐂𝐡𝐚𝐧𝐝𝐫𝐚𝐧) यांची ही बदली झाली आहे. सात महिन्यापूर्वीच ते महानगरपालिकेत आले होते. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, पुणे येथे प्रकल्प संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर यशदाचे उपमहासंचालक पवनीत कौर (𝐏𝐚𝐯𝐧𝐞𝐞𝐭 𝐊𝐚𝐮𝐫) यांची चंद्रन यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.

follow us