आयुष्मानचा पाचवा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये, ‘थामा’ ने गाठला 100 कोटींचा पल्ला!
Thama हा आयुष्मान खुरानाचा पहिला मोठा दिवाळी रिलीज सिनेमा आता अधिकृतपणे 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे!
Ayushmann’s fifth film in the 100 crore club, ‘Thama‘ reaches the 100 crore mark : बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाचा पहिला मोठा दिवाळी रिलीज सिनेमा ‘थामा’ आता अधिकृतपणे 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे! या यशासह, आयुष्मानने आपल्या हटके आणि अनोख्या सिनेमा शैलीद्वारे पाच 100 कोटींच्या हिट फिल्म्स दिल्या आहेत.
Video : राजकीय गणित बदलण्याची ताकद असणारे दादांचे दोन ‘हुकमी एक्के’ भाजपात डेरेदाखल
‘थामा’ ने भारतात ₹103.50 कोटी (नेट बॉक्स ऑफिस) इतकी कमाई केली आहे. याआधी त्यांच्या इतर 100 कोटींच्या हिट्स म्हणजे ‘ड्रीम गर्ल’ (₹142.26 कोटी), ‘ड्रीम गर्ल 2’ (₹104.90 कोटी), ‘बधाई हो’ (₹137.61 कोटी) आणि ‘बाला’ (₹116.81 कोटी) आहेत.
Video: PM मोदी ‘किलर’ तर, पाकचा असीम मुनीर ‘महान सेनानी’; ट्रम्प पुन्हा बरळले
या उल्लेखनीय यशासह, आयुष्मान खुराना आता असे तरुण अभिनेते ठरले आहेत ज्यांनी सर्वाधिक यशस्वी फ्रँचायझेस सुरू केल्या आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत ‘ड्रीम गर्ल’, ‘बधाई हो’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘थामा’ आणि ‘अंधाधुन’ सारख्या मालिकांची पायाभरणी केली आहे, ज्यांच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकरांच्या साखरपुड्याचे खास क्षण!
आयुष्मानने आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं —“व्यावसायिक यश हे प्रत्येक अभिनेत्यासाठी मोठं समाधान असतं. माझ्या सिनेमा शैलीसोबत असं यश मिळणं माझ्यासाठी खास आहे, कारण मला नेहमीच नवं, वेगळं आणि प्रामाणिक कंटेंट आवडतं. प्रेक्षकांना असं सिनेमा आवडताना, ते इतरांपर्यंत पोहोचवताना पाहणं हे एका कलाकारासाठी अत्यंत आनंददायी आहे. माझ्या इतक्या चित्रपटांनी फ्रँचायझ बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी माझ्या सिनेमा आणि कलेवर जो प्रेम वर्षाव केला आहे, त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.”
