शरद पवारांचा बालेकिल्ला ढासळतोय…गळती रोखण्यात लोकप्रतिनिधींना अपयश
Sharad Pawar यांचा कधीकाळी अहिल्यानगर जिल्हा हा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र विधानसभेनंतर पक्षाला लागलेली गळती काही केल्या रोखता येईना.
Sharad Pawar’s stronghold is crumbling…people’s representatives have failed to stop the leaks : कधीकाळी अहिल्यानगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. पवारांचे अनेक विश्वासू शिलेदार या जिल्ह्यात असून पवारांचे व्यक्तिगत संपर्क या नेत्यांशी असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीचा बोलबाला असायचा. मात्र आता हळहळू परिस्थिती बदलू लागली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला मिळालेले घवघवीत यश यामुळे अनेकांनी पक्षासोबत राहणे पसंत केले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर पवारांच्या पक्षाला लागलेली गळती आता काही केल्या रोखता येईना. आगामी निवडणुका या येत्या काही दिवसात पार पडणार मात्र त्यापूर्वीच पक्षातून कार्यकर्ते पदाधिकारी हे बाहेर पडत आहे. यामुळे आगामी निवडणुका पाहता पक्षाला लागलेली गळती हि शरद पवारांसाठी धोक्याची घंटा मनाली जात आहे.
आयुष्मानचा पाचवा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये, ‘थामा’ ने गाठला 100 कोटींचा पल्ला!
येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहे . महायुती विरुद्ध थेट महाविकास आघाडी असाच सामना या निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळणार. एकीकडे महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. तर दुसरीकडे आघाडीमधील घटक पक्षातून अनेक जण सत्ताधारी पक्षांकडे वाटचाल करत आहे. असेच चित्र नगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळते आहे. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा नगर जिल्ह्यात सध्या दोन्ही पक्षाची अत्यंत वाईट अवस्था झालेली पाहायला मिळते आहे.
राष्ट्रवादीला गळती…
शरद पवार यांच्या पक्षामधील अनेक विश्वासू साथीदारांनी पवारांची साथ सोडली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनतर अवघ्या काही दिवसांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले राम शिंदे यांनी फाळके यांची भेट घेतली. दरम्यान रोहित पवार यांचे कट्टर विरोधक असलेले शिंदे यांनी तातडीने फाळके यांनी भेट घेतल्याने काहीतरी राजकीय समीकरण जुळून येणार अशी चर्चा रंगली. तर अकोले या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाला जोरदार झटका बसला आहे.
Video : बच्चू कडूंनी पहिले होकार अन् मग नकार कळवला; फडणवीसांनी मध्यरात्रीची घडामोड सांगितली
माजी आमदार राहिलेले दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या पत्नी सुनीता भांगरे यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भांगरे यांनी भाजपात जाणे पासून केलं. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुनीता यांचे पुत्र अमित भांगरे यांच्या विजयासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये अमित यांचा पराभव झाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आगामी काळात पार पडणार त्यापूर्वीच भांगरे यांनी शरद पवारांची साथ सोडत कमल हाती घेतले. यामुळे राष्ट्रवादीला जिल्ह्यात एकापाठीमागे एक धक्के बसत आहे.
पक्ष बळकटीकरणामध्ये लोकप्रतिनिधी अपयशी?
नगर दक्षिण मधून निलेश लंके हे खासदार म्ह्णून निवडून आले. सुजय विखे यांचा पराभव केल्याने लंके यांच्याकडून मोठ्या अपेक्षा पक्षाला होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये लंके यांची जादू चालली नाही. विधानसभेनंतर अनेकांनी पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे राज्यात चाललेल्या राजकीय घडामोडीकडे लक्ष देता देता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा मतदार संघ त्यांच्या विरोधकांनी पोखरून काढला. यामुळे लंके असो वा रोहित पवार यांना पक्षामध्ये सुरु असलेली गळती रोखता येईना असेच चित्र सध्या जिल्ह्यात निर्माण झालेआहे.
शरद पवार नगर जिल्हा दौऱ्यावर
आगामी काळात निवडणुका पार पडणार आहे मात्र ऐन निवडणुकीपूर्वी पक्षांतराला देखील वेग आला आहे, महापालिका निवडणुकांपूर्वी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणारे नेते आणि कार्यकर्ते सुरू असलेलं पक्षांतरण हे जवळपास सर्वच पक्षांसाठी आता डोकेदुखीचा विषय ठरत आहे. 2 नोव्हेंबर रोजी शरद पवार हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत, त्यापूर्वीच शरद पवार गटाला दोन मोठे धक्के बसले आहे. दरम्यान आता पवार हे नगरमध्ये येणार असून ते कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधणार हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे.
