Rohit Pawar यांना ईडीकडून पुन्हा मुदत वाढ; एका आठवड्यानंतर होणार चौकशी

Rohit Pawar : विरोधी पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारे चौकशी समन्स आणि चौकशी सत्र चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची उद्या (24 जानेवारी) अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून (ED) चौकशी होणार होती. मात्र आता ही चौकशी एक आठवडा लांबवणीवर गेली आहे. रोहित पवारांच्या मागणीनंतर ही मुदत वाढ […]

Rohit Pawar यांना ईडीकडून पुन्हा मुदत वाढ; एका आठवड्यानंतर होणार चौकशी

Rohit Pawar

Rohit Pawar : विरोधी पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारे चौकशी समन्स आणि चौकशी सत्र चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची उद्या (24 जानेवारी) अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून (ED) चौकशी होणार होती. मात्र आता ही चौकशी एक आठवडा लांबवणीवर गेली आहे. रोहित पवारांच्या मागणीनंतर ही मुदत वाढ देण्यात आली आहे.

आसाममध्ये राहुल गांधी अडचणीत! मुख्यमंत्री हिमंता यांनी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना…

दरम्यान कागदपत्रांची पूर्तता किंवा इतर काही तांत्रिक बाबी तसेच न्यायालयीन लढाई या सर्व गोष्टींच्या पूर्वतयारीसाठी रोहित पवार यांनीही वेळ वाढवून घेतली असल्याचं बोललं जात आहे. कारण ईडी समोर जाताना सबळ पुरावे सोबत असणं गरजेचं असतं. दरम्यान अगोदर आज 23 जानेवारीला रोहित पवारांची चौकशी होणार होती. मात्र त्यांनी अगोदर एक दिवसाचा कालावधी वाढवून घेतला. त्यामुळे ही चौकशी बुधवारी होणार होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा आठ दिवसांचा वेळ मागून घेतल्याने ईडी चौकशी आठ दिवसांनी होणार आहे.

शरद पवार-ठाकरे गटाला ‘धाकधूक’; निवडणुकीच्या तोंडावरच पक्षचिन्हांवर टांगती तलवार

दुसरीकडे या चौकशीच्या निमित्ताने पक्षाध्यक्ष शरद पवार आणि संपूर्ण पक्ष शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत होता. त्यामध्ये उद्या रोहित पवार यांना चौकशीला सोडायला खासदार सुप्रिया सुळे आणि हजारो कार्यकर्ते जाणार होते. तर राष्ट्रवादीचे कार्यालय ईडी कार्यालयाच्या जवळ आहे. त्यामुळे चौकशीवेळी स्वतः शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार होते.

त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात जेव्हा रोहित पवार यांची चौकशी होईल त्यावेळी शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत असलेला शरद पवार यांचा गट हे चौकशीला कशाप्रकारे सामोरे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांच्या बारामती अ‍ॅग्रो कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. याशिवाय पुणे, बारामती आदी 6 ठिकाणीही ईडीने छापेमारी केली होती. यासोबतच आयकर विभागाने देखील रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड साखर कारखान्यावरही छापा टाकला होता.

Exit mobile version