Mla Rohit Pawar News : सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांवर जोरदार पलटवार करण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 12 वी फेल चित्रपट पाहिला आणि सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात पवारांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत सरकारमध्ये बसलेल्यांनी 12 वी फेल चित्रपट पाहिला पाहिजे, असा खोचक सल्लाही दिला आहे.
सामान्य कुटुंबातील मुलांना कसा संघर्ष करावा लागतो, किती कष्ट घ्यावे लागतात हे दाखवणारा सद्यस्थितीवरचा #12thFailMovie हा #OTT प्लॅटफॉर्मवर पाहिला. सामान्य कुटुंबातील मुलांचा हा संघर्ष प्रत्यक्ष दिसत नसला तरी किमान सिनेमात तरी पाहून कळेल, म्हणून सरकारमध्ये बसलेल्या सर्वांनीच हा… pic.twitter.com/jzb4ZC0lTs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 17, 2024
रोहित पवार पोस्टमध्ये म्हणाले, “सामान्य कुटुंबातील मुलांना कसा संघर्ष करावा लागतो, किती कष्ट घ्यावे लागतात हे दाखवणारा सद्यस्थितीवरचा #12thFailMovie हा #OTT प्लॅटफॉर्मवर पाहिला. सामान्य कुटुंबातील मुलांचा हा संघर्ष प्रत्यक्ष दिसत नसला तरी किमान सिनेमात तरी पाहून कळेल, म्हणून सरकारमध्ये बसलेल्या सर्वांनीच हा सिनेमा पाहिला पाहिजे… तरच ते मुलांबाबत #serious होतील, अशी अपेक्षा करू!” असं रोहित पवार पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
पेपरफुटीविरोधातील आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक
रोहित पवार यांनी 12 वी फेल चित्रपट पाहिल्यानंतर ही पोस्ट लिहिली आहे. पवार यांनी ही पोस्ट लिहिल्यानंतर त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी प्रतिसाद दिल्याचंही पाहायला मिळालं आहे. दरम्यान, एखादा विद्यार्थी 12 वी फेल झाल्यानतर त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रियांवर आधारित या चित्रपटाची स्टोरी आहे. अनेकांनी या चित्रपटाचं कौतूक केलं असून चित्रपटाची राजकीय क्षेत्रातील लोकांनाही भूरळ पडल्याचं दिसून येत आहे.
दिग्दर्शक विधु चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या 12 वी फेल चित्रपटाला सध्या चांगलच यश मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 70 कोटींपेक्षा जास्त आकडा गाठला आहे. अशातच आता राजकीय नेत्यांकडूनही चित्रपटाला पसंती मिळत असल्याने नेटकऱ्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.