Download App

अजितदादा फरफटत जाणार नाहीत, योग्यवेळी ताकद दाखवतील; रोहित पवारांचे सूचक विधान…

  • Written By: Last Updated:

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. काल या नवनियुक्त मंत्र्यांना बंगले आणि दालनं मिळाली. मात्र, अद्याप रखडेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) झाला नाही. दरम्यान, खातेवाटपचाच्या चर्चा सुरू असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितल्या जातं. मात्र, खातेवाटपापाच तिढा काही सुटता सुटेना. यावरून आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारवर टीका करत अजित पवारांनाही टोला लगावला. अजितदादा मविआत होते, तेव्हा खातेवाटपा निर्णय तात्काळ घ्यायचे. मात्र, अद्याप खातेवाटप झालं नाही, याचं आश्चर्य वाटत असल्याचं रोहित पवार म्हणाले. (Rohit Pawar On Cabinet expansion and ajit pawar)

रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, मला आश्चर्य वाटतं, अजितदादा जेव्हा इथं होते, तेव्हा खातेवाटपाचा निर्णय देखील तात्काळ घेत होते. मविआतही कोणाला कोणतं खातं मिळणार, हे तर आधीच ठरलं होतं. मात्र, भाजपची पद्धत वेगळी आहे. भापज आमदारांना मंत्रिपदासाठी झुलवतं ठेवते. त्यामुळं दोन पक्षात भांडणं लागतील. जेवढी भांडणं जास्ततेवढा भाजपचा फायदाच आहे. मात्र, यामुळं राज्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं आहे. या सगळ्या गोंधळात सामान्यमाणंसांचे प्रश्न बाजूला राहतात, असं रोहित पवार म्हणाले.

SPMCIL Recruitment : पदवीधरांसाठी सिक्युरिटी प्रिंटिंग इंडियामध्ये सरकारी नोकरीची सधी, दरमहा 1,40,000 रुपये पगार 

अजित पवारांची सत्तेमध्ये खातेवाटपावरून फरपट होत चालली का? असा प्रश्न विचारताच रोहित पवार म्हणाले, दादांचा स्वभाव कडक आहे. ते फरफटत जाणार नाही. योग्यवेळी योग्य ताकद दाखवतील. फक्त आमच्यासोबत राहून त्यांनी आपली ताकद दाखवली असती, तर तर आम्हाला आनंद झाला असता, असं ते म्हणाले.

तीन पक्षांच्या सरकारवरूनही रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाचा समाचार घेतला. ते म्हणाले, मविआला तीन चाकाची रिक्षा अशी टीका भाजप करायचं. मात्र, त्यात खातेवाटप आधीच ठरलं होतं. आणि सत्तास्थापन झाल्यार त्यांनी लगेचच काम करायला सुरूवात केली. इथं मात्र, तीन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेला चालली अन् महाराष्ट्र आहेच तिथं आहे. सरकारमध्ये सध्या अशांतता आहे. कोकणातला एक आणि मराठवाड्यात एक आमदार भांडतो. चार दिवस थांबत थांबत या सरकारने वर्ष काढलं. त्यामुळं आणखी चार दिवस थांबा असं आमदारांना सांगितल्या जातं. असंच आणखी एक वर्ष सरकार काढेल, असं पवार म्हणाले.

ते म्हणाले, जिल्हा परिषदल आज प्रशासक आहे. जिल्हा परिषदेला निधी दिला जात नाही. केवळ 12 टक्के निधीच दिला जातो.
मुख्यमंत्र्यानी आश्वासन देऊन देखील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप दिली नाही. कांद्याचे अनुदान अद्याप मिळालं नाही. आमदार निधीला देखील टप्पे करण्य़ात आले. पैसा आहे की, नाही? का कोणाला खुश करण्यासाठी हा पैसा वापरल्या जातो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Tags

follow us

वेब स्टोरीज