जेजुरीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; कार्यक्रमच रद्द…

जेजुरीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; कार्यक्रमच रद्द…

Jejuri shasan Aplya dari : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या (दि.13) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडचा सांगाडा रात्री कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव तथा राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी पत्राद्वारे उद्या होणारा कार्यक्रमच रद्द करण्यात आल्याचे पत्रक काढले आहे. हा कार्यक्रमाची सुधारीत तारीख लवकरच कळवण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.(pune jejuri shasan aplya dari program shed collapsed no casualties)

‘मी अदिती तटकरेंपेक्षा चांगलच काम करेन, महिला-पुरुषांत फरक असतोच ना’; गोगावलेंचं वादग्रस्त वक्तव्य

जेजुरीत उद्या गुरुवारी शासन आपल्या दारी आणि जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जेजुरीतील पालखी तळावर भव्य-दिव्य असा मंडप उभारण्याचे काम सुरु आहे. साधारणपणे 1 लाख 57 हजार क्वेअर फूट क्षेत्रफळाचा व सुमारे 21 हजार लोकांसाठी हा भव्य मंडप उभारण्यात येत आहे. गेले अनेक दिवसांपासून भव्य मंडप उभारण्यात येत आहे. गेत आठवड्यापासून याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेसाठी उभारणार स्वतंत्र यंत्रणा; गिरीष महाजनांची घोषणा

मुख्य व्यासपीठ आणि त्यासमोर व्हिआयपी कक्ष उभारला जात होता. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास या कक्षाच्या मंडपसाठी लोखंडी पिलर उभारुन सांगाडा तयार करण्यात आला होता. सांगाडा पूर्ण उभारल्यानंतर कामगार झोपण्यासाठी गेले असताना हा संपूर्ण सांगाडा अचानक कोसळला. सांगाडा कोसळला तेव्हा सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही नसल्याने जीवितहानी टळली मात्र कार्यक्रमापूर्वीच हा अपघात झाल्याने भविष्यातील मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरु आहेत.

रात्री सांगाडा कोसळल्यानंतर ठेकेदाराने रात्रीत सांगाडा उभा करण्यासाठी कामगारांना कामाला लावले आहे. आज सकाळपर्यंत संपूर्ण कोसळलेला सांगाडा खोलून पुन्हा उभा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण सर्वजण काम आटपून झोपायला गेल्यानंतर हा अपघात झाल्याचे कामगारांनी सांगितले आहे.

या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मोठा मंडप, लाभार्थ्यांसाठी वितरण व्यवस्था, मान्यवरांसाठी वातानुकूलित कक्ष, विविध उत्पादकांसाठी बचतगटांसाठी स्टॉल, लाभार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृहे आदी सोयी सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत.

या मेळाव्यासाठी पन्नास ते साठ हजार लाभार्थी त्याचबरोबर शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पुणे-बारामती रस्त्यावरुन जड, अवजड व इतर वाहने बंद करण्यात येणार आहेत. सुमारे सहाशे एस.टी.बस आणि वाहनांसाठी तीन ठिकणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube