Download App

Baramati Agro : साडेतीन लाख लोकांच्या कुटुंबाशी खेळ, ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Rohit Pawar : दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची बारामती ॲग्रोशी (Baramati Agro) संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवारांना हा मोठा धक्का असल्याचं मानल्या जातं. ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती ॲग्रोच्या कन्नड साखर कारखान्याची 161.30 एकर संपत्ती जप्त केली. त्यानंतर आज रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

दिल्ली अब दूर नही…! निलेश लंकेंनी फुंकले नगर दक्षिण लोकसभेचे रणशिंग… 

रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार की, ईडीने कन्नडमधील कारखान्यावर प्रतिकात्मक जप्तीची कारवाई केली आहे. मात्र, अजून पर्यंत जप्तीची नोटीस आम्हाला मिळालेली नाही. पण ईडीच्या ट्विटर अकाऊंटवरील प्रेस नोट पाहिल्यावर आम्हाला ही माहिती मिळाली. जप्ती म्हणजे पूर्णपणे जप्ती नसते, ती एक प्रतिकात्मक जप्ती आहे. 180 दिवसांची मुदत दिली जाते. त्यामध्ये बरीच मोठी प्रक्रिया असते. त्याचा वापर करून आपली बाजू मांडायची असते. ती प्रक्रिया पुढे चालू असेल, असं रोहित पवार म्हणाले. मी सर्व शेतकरी, कर्मचारी, बँका आणि कंपनीवर अवलंबून असलेल्या आश्वासित करतो की, अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

आढळरावांनी मोहितेंच्या घरी चहा घेतला ; वीस वर्षांचा वाद सांगत मोहितेंनी तोफ डागली ! 

साडेतीन लाख लोकांच्या कुटुंबाशी खेळ
बारामती अॅग्रो लिमिटेड ही कंपनी 1988 मध्ये अप्पासाहेब पवार अर्थात माझ्या आजोबांनी सुरू केली होती. 2000 च्या सुमारास माझे वडील कंपनीकडे लक्ष देऊ लागले. मी 2007 मध्ये या कंपनीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सध्या या कंपनीत साडेआठ हजार कर्मचारी व कामगार कार्यरत आहेत. कुटुंबियांची संख्या लक्षात घेतल्यास सुमारे 50 हजार लोक या कंपनीवर अवलंबून आहेत. कंत्राटी कामगार व इतर संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश केल्यास हा आकडा तीन ते साडेतीन लाखांच्या आसपास पोहोचतो. जर तुम्ही या कंपनीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहत असाल तर मला त्यांना सांगायचे आहे की, तुम्ही साडेतीन लाख लोकांच्या कुटुंबाशी खेळ करू शकता, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, संपूर्ण बारामती ॲग्रो कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रथम फाईल केल्यानंतर दोन वर्षे ईडीने मौन बाळगलं. पण जेव्हा राज्यात सरकार बदलले आणि पक्षात फूट पडली तेव्हा… जेव्हा अजितदादांनी साहेबांचा पक्ष चोरी करून आमदारांनी घेऊन बंड केलं, त्यानंतर माझ्यावर जोरात कारवाया सुरू झाल्या, असंही रोहित पवार म्हणाले.

 

follow us

वेब स्टोरीज