Download App

Baramati Agro : ‘मी डगमगणार नाही अन् झुकणार नाही’; काररखान्याच्या नोटीसीवरून रोहित पवारांनी सुनावलं

  • Written By: Last Updated:
Image Credit: Mla Rohit Pawar

Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे (Baramati Agro Company) दोन प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली होती. दोन नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. दरम्यान, रोहित पवार यांनी आता पुन्हा एकदा यावर भाष्य केलं. कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण ताकदीनीशी लढेल, कुणापुढं झुकणार नाही, असा शब्दात सुनावलं.

Ajit Pawar : अजितदादांचं ‘राजकीय आजारपण’ दूर; अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलचं 

गेल्या काही दिवसांपासून बारामती अॅग्रो कंपनी वादात सापडली. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने रोहित पवार यांना रात्री दोन वाजता नोटीस पाठवून ही कंपनी बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी रोहित यांनी हे घाणेरडं रजाकराण असून याविरोधात लडा सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली होती. दोन वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून द्वेषाच्या भावनेतून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले.

आता रोहित पवार यांनी ट्विट करून सांगितलं की, माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकूण जरा आश्चर्यच वाटलं.

ते म्हणाले, केवळ राजकीय द्वेश या एकमेव कारणामुळं माझ्या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला नाही तर याव्यतिरीक्तही अनेक कारणं आहेत. त्यामुळं भविष्यात ही केस लढायला शासनाकडून बड्या वकीलांची फौज उभी केली जाईल, जी सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी कधीही उभी केली जात नाही. पण तरीही मी डगमगणार नाही.
कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण ताकदीनीशी लढेल. कुणापुढे झुकणार नाही, कारण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे!, असं ट्विट रोहित पवारांनी केलं.

बारामती ऍग्रो काय आहे?

बारामती अॅग्रो लिमिटेड हा एक उद्योग आहे. रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ आहेत. त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत. पशुखाद्य हे बारामती अॅग्रोचे मुख्य उत्पादन असून कंपनीने साखर उत्पादन सुरू केले. कंपनीचे बारामती आणि छत्रपती संभाजीनगर येथे दोन साखर कारखाने आहेत. बारामती अॅग्रोतर्फे दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायही केला जातो. मात्र या कंपनीचे दोन प्लांट प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर रोहित पवार यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. याप्रकणी मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने कोणताही कारवाई करू नये, असे आदेश दिला. दरम्यान, पुढील कारवाई ६ तारखेला होणार असून या सुनावणीत काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज