Rohit Pawar : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारातमी अॅग्रो कंपनीच्या (Baratami Agro Company)कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. यानंतर रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजित पवारांनी बंड केल्यानंतर माझ्यावर जोरात कारवाया सुरू झाल्या, मी सरकार विरोधात लवढतोय म्हणून ईडीच्या नोटीसा दिल्या जाताहेत, असा आरोप रोहित पवारांनी केला.
Baramati Agro : साडेतीन लाख लोकांच्या कुटुंबाशी खेळ, ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक
रोहित पवार म्हणाले, निवडणुका असतात तेव्हा ईडी नोटीस पाठवते. मी सरकारच्या विरोधात जास्त बोलताोय, टीका करतोय, संघर्ष यात्रा काढतोय, म्हणून अशा कारवाया केल्या जात आहेत. निवडणुकीच्या आधी मी शांत बसाव म्हणून ही नोटीस दिली जातेय, मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकसभेला डोळ्यासमोर ठेवून माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. पूर्ण बारामती ॲग्रो कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रथम फाईल केल्यानंतर दोन वर्षे ईडीने मौन बाळगले. पण जेव्हा राज्यात सरकार बदलले आणि पक्षात फूट पडून अजितदादांनी साहेबांकडून पक्ष हिसकावून घेतला आणि आमदारांसोबत घेऊन बंड केलं, त्यानंतर माझ्यावर जोरात कारवाया सुरू झाल्या, असं रोहित पवार म्हणाले.
दिल्ली अब दूर नही…! निलेश लंकेंनी फुंकले नगर दक्षिण लोकसभेचे रणशिंग…
ते म्हणाले, अशीच प्रेस नोट जरंडेश्वर कारखान्याला आली होती. ही प्रेस नोट कट कॉपी पेस्ट केली आहे. आम्ही कुठंही काही लपवलेले नाही. जी काही माहिती उपलब्ध आहे ती ईडीला देण्यात आली आहे. प्रेस नोटच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. बारामती अॅग्रोमध्ये दुसरे गुंतवणूकदार नाहीत. ही डमी कंपनी नाही. यात सर्व कष्टाचा पैसा आहे.
पुढं बोलतांना रोहित पवार म्हणाले की, आम्ही कोर्टात गेलो तर त्यांची कारवाई कुठेही टिकणार नाही. त्यामुळं आम्ही घाबरत नाही. माझे नाव आरोपींमध्ये नाही. ७० टक्के आरोपी हे भाजप, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे आहेत. मी तर हा कारखाना महागड्या किमतीत विकत घेतला. ज्यांनी आधी खरेदी केला ते भाजपचे लोक आहेत. त्यांनी माझ्यापेक्षा स्वस्तात कारखाना घेतला. मात्र, आजपर्यंत एकाही व्यक्तीवर कारवाई झालेली नाही. माझ्यावर केस केली तर मी लढणार… कोणी किती स्वस्तात कारखाना घेलता याची माझ्याकडे आहे, असा इशाराही रोहित पवारांनी दिला.
दोन-तीन महिन्यांत मी तुरुंगात
येत्या दोन-तीन महिन्यांत मी तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. जर कोणी आपल्या मेहनतीने कंपनी मोठी करत असेल तर अशी द्वेषपूर्ण कारवाई करणे चुकीचे आहे. मी भाजपमध्ये गेलो तर कारवाया थांबतील, पण लढेन. मी उद्या सकाळी ९ वाजता कन्नडला जाऊन शेतकरी आणि माझ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे, असं रोहित पवार म्हणाले.