Rohit Pawar Protest March in Nagpur NCP says its his own decision : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार महायुतीविरोधात नागपरूमध्ये न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे. मात्र या मोर्च्यात सहभागी होऊ नये असे सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्याकडून विदर्भातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमंक काय म्हणाले शशिकांत शिंदे?
पक्षाचं चिन्ह वापरून आंदोलनाला पक्षाची भूमिका आणि मंजूरी घेऊन चर्चा करून जालं तर त्याला कोणतीही हरकत नाही. मात्र पक्षाचं चिन्ह न घेता त्यांनी ते आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. अस वैयक्तिक निर्णय ते घेऊ शकतात. विदर्भाचा मोर्चा ताकदीनं करायचा असेल तर सगले प्रश्न घेऊन केला पाहिजे तेव्हा यावर चर्चा होईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ.
शरद पवार निवृत्ती जाहीर करणार का? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचनेनंतरही रोहित पवार मोर्चा काढण्यावर ठाम असून पक्षाच्या तुतारी चिन्ह न वापरता रोहित पवार मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांच्याकडून घेण्यात आलेल्या बैठकीत विदर्भातील पक्षाचे सर्व पदाधिकारी नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने पुढे काय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. रोहित पवार विदर्भ क्षेत्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर यांच्या मागण्या घेऊन विधिमंडळावर 9 डिसेंबरला मोर्चा काढणार आहे.
पुण्यातल्या भाऊंची कुंडली आता एका क्लिकवर; दादा-भाऊ सगळ्यांचा हिशेब होणार
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असून केंद्रात आणि राज्यात देखील सत्तेत सहभागी होणार असून याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मात्र रोहित पवार यांनी भाजपासोबत जाण्यास नकार दिल्या असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळेच आता पक्षात रोहित पवार यांना डावलण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
