‘मी तीन दिवसांपूर्वी नानांना फोन केला होता…’; नाना पाटेकर फोनवर काय म्हणाले? रोहित पवारांनी रडतच सांगितलं

Rohit Pawar Reveals Nana Patekar’s Support for MPSC Protest; नाना पाटेकरांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता, असे रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar Reveals Nana Patekar’s Support for MPSC Protest

Rohit Pawar Reveals Nana Patekar’s Support for MPSC Protest

Rohit Pawar Reveals Nana Patekar’s Support for MPSC Protest: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनाने संपुर्ण सिनेसृष्टीसह देशावर शोककळा पसरली आहे. आज पहाटे गोव्यात त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. नाना फक्त सिनेमातील हिरो नव्हते, ते खऱ्या आयुष्यातही हिरोसारेखच होते. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम केलं. देशातील समस्यांवर परखडपणे भाष्य केलं. पुण्यात सध्या MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनालाही नानांचा पाठींबा होता. अशी माहिती रोहित पवारांनी दिली.

‘क्रांतिवीर’ पडद्यावरचे, देशभक्ती रक्तातली, नाना पाटेकरांच्या धाडसी देशभक्तीचा पराक्रम

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. सकाळी उठल्यावर नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी कळाली. नानांचे आमच्या कुटुंबांशी जवळचे संबंध होते. असे रोहित पवार म्हणाले आणि त्यांनी नाना पाटेकरांना श्रद्धांजली वाहिली.

नाना पाटेकरांनी तीन दिवसांपुर्वीच आपल्या आंदोलनाला पाठींबा असल्याचं फोन करुन सांगितलं होतं. मी तीन दिवसांपूर्वी एका मित्राच्या माध्यमातून नानांना फोन केला आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येण्याची विनंती केली. तेव्हा नाना मला म्हणाले, तुला सांगायची गरज नाही. ते सर्व विद्यार्थी आपलेच आहेत.

वय वाढेल तसे काही पुढारी अधिकच वेड्यासारखे वागतात, इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चर्चेचा विषय

नानांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण पवार कुटुंब आणि MPSC चे विद्यार्थी त्यांच्यासोबत आहेत, नानांनी पेरलेले विचार, रोखठोकपणे विचार मांडण्याची पद्धत हे विद्यार्थी पुढे घेऊन जातील, असे रोहित पवार म्हणाले. यावेळी रोहित पवारांना अश्रूही अनावर झाले.

Exit mobile version