Rupali Chakankar : दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) गटाने शरद पवार गटाच्या खासदारांच्या अपात्र करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेत वंदना चव्हाण, फौजिया खान आणि मोहम्मद फैजल, श्रीनिवास पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावर सुप्रिया सुळेंना हरकत घेतली. श्रीनिवास पाटील 83 वर्षांचे आहेत. अपात्रतेची कारवाई व्हावी, असं त्यांनी काही केलं नाही, असं म्हणत सुळेंनी आक्षेप घेतला. यावरून सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही टीका केली
Sushama Andhare : नगरमध्ये सुषमा अंधारेंच्या फोटोला फासलं काळं, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकर यांनी एक कविता ट्विट करत सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. त्यांनी लिहिलं की, तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?
चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?
तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?
पाया भरला, विटा-वासे तोलून धरले
घराचा उंबराच विचारे
तू कुठं काय केलंस?
नांगर धरला, शेती केली
भुईला भीमेचं भान दिलं
मुसक्यांची गाठ विचारे
तू कुठं काय केलंस?
घामाला दाम दिला
कष्टाला मान दिला
रक्ताचं पाणीच विचारे
तू कुठं काय केलंस?
– प.पा.
ही कविता पोस्ट करत चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अजित पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर टीका केली होती.
तिरुअनंतपुरममध्ये भारत कांगारुंशी भिडणार, जाणून घ्या पिच रिपोर्ट…
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
अजित गटाच्या नेत्यांनी आमचे खासदार श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल, फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांना अपात्र करण्याची मागणी का केली, हे मला समजत नाही. आमचे खासदार चांगले काम करत आहेत. पाटील यांचे वय 83 आहे. ते साताऱ्याचे खासदार आहेत. ते त्यांच्या कामात अतिशय कुशल आहेत. तरी त्यांच्या अपात्रचेची मागणी का होतेय, हे मला समजत नाही.
सुळेंनी घेतलेल्या आक्षेपावर सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
काय म्हणाले सुनील तटकरे?
अजित पवारांनी बारामती शहर 30 वर्षे उभं केलं. दादा… दादा… दादा म्हणत ज्याचं राजकीय आयुष्य गेलं. मग अजित पवारांविरोधात याचिका दाखल करतांना राजकीय विचार वेगळं असल्याचं सुचलं. मला श्रीनिवास पाटलांविषयी आदर आहे. पण, राजकीय लढाईत वयोमर्यादा हा विषय नाही, सुप्रिया सुळे सहानुभूती मिळवत आहेत, अशी टीका तटकरेंनी केली.
आता रुपाली चाकणकर यांनी केलेल्या टीकेला आता सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.