अंगात अशक्तपणा, फणफणारा ताप; आजारी असूनही जयंत पाटलांचा रुपाली चाकणकरांना फोन

  • Written By: Published:
अंगात अशक्तपणा, फणफणारा ताप; आजारी असूनही जयंत पाटलांचा रुपाली चाकणकरांना फोन

Rupali Chakankar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवा (Ajit Pawar) यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. अशात आज भाऊबीज आहे. दरवर्षी जयंत पाटील (Jayant Patil) हे भाऊबीजेनिमित्त रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याकडून ओवाळून घेतात. मात्र, यंदा त्यांना डेंग्यूची लागण झाल्यानं ते चाकणकरांकडे जाऊ शकले नाही. दरम्यान, यावर आता रुपाली चाकणकर यांनी भाष्य केलं. जयंत पाटील माझे बंधू लवकरात लवकर बरे होतील, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

Government Schemes : दीनदयाल उपाध्याय स्वयम हॉस्टेल स्कॉलरशिप योजना आहे तरी काय? 

पुण्यातील भोई प्रतिष्ठानतर्फे गंज पेठेतील अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयात भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रवींद्र धंगेकर, आयोजक मिलिंद भोई सहभागी झाले होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांचे औक्षण केलं. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, गेली २८ वर्षीची अशा पध्दतीने भाऊबीज साजरी करण्याची पंरपरा आहे. मागील सोळा वर्षापासून मी अग्निशमन दलाच्या भाऊबीजेच्या कार्यक्रमाला येते. हा सण फायर ब्रिगेडच्या तरुणांसोबत साजरा केला जातो. सर्व पक्षीय मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती असते. एक कुटुंब म्हणू आम्ही यांच्यासोबत असतो. सर्व जवानांना भाऊबीजेच्या शुभेच्छा. आज या कार्यक्रमादरम्यान, चंद्रकांत पाटील, आमदार रवीद्र धंगेकर यांचं औक्षण केलं, असं त्या म्हणाल्या.

World Cup 2023 : टीम इंडियाला पहिला धक्का! तुफानी खेळीनंतर रोहित बाद 

दरम्यान, सध्या जयंत पाटील आणि रुपाली चाकणकर हे दोन्ही वेगवेगळ्या गटात आहे. दरवर्षी पाटील हे चाकणकरांकडे भाऊबीजेला येतात. मात्र, यंदा ते आले नाही. यावरही त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, माझे बंधू जयंत पाटील यांना डेंग्यू झाला असून ते आजारी आहेत. त्यामुळं ते भाऊबीजेला येऊ शकले नाहीत. ते लवकरात लवकर बरे होतील, तसेच जयंत पाटील यांनी फोन करून मला भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या, असंही चाकणकर म्हणाल्या.

बारामतीत भाऊबीज साजरी होतेय, याविषयी विचारलं असता चाकणकर म्हणाल्या की, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. पण, नातेसंबंध आपल्या ठिकाणी असतात. नात्यांमध्ये राजकारणाची गफलत करू नये. नाती जपली पाहिजेत. कुटुंब जोपासले पाहिजे. नाती जपली पाहिजेत. कुटुंब एकत्रित राहायला पाहिजे. बारामतीत सगळे एकत्र येत आहेत, याचा आनंदच आहे, असं चाकणकर म्हणाल्या.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube