‘अजित पवार कमळाच्या तिकीटावरच निवडणूक लढवणार’; वडेट्टीवारांनी खात्रीशीर सांगितलं

‘अजित पवार कमळाच्या तिकीटावरच निवडणूक लढवणार’; वडेट्टीवारांनी खात्रीशीर सांगितलं

Vijay Wadettivar On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) निवडणूक कमळाच्या तिकीटावरच लढवणार असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी खात्रीशीरपणे सांगून टाकलं आहे. राज्यात झालेल्या पक्षांतर्गत घडामोडींनंतर आता अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादी पक्षावरुन निवडणुकीत आयोगात सुनावणीही सुरु आहे. अशातच दिवाळीनिमित्त अजित पवार शरद पवारांना भेटल्यानंतर थेट दिल्लीत त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. त्यावर वडेट्टीवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हैदराबादमध्ये केमिकल गोदामाला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 2 महिला

वडेट्टीवार म्हणाले, दिवाळीनिमित्त पवार कुटुंबाची जी भेट झाली आहे, ती कौटुंबिक असावी राजकीय नाही, याबद्दल खासदार सुप्रिया सुळेंनीही स्पष्ट केलं आहे. आगामी निवडणुकीत अजित पवार कमळाच्या तिकीटावरच लढणार आहेत. त्याशिवाय पर्याय नाही. मला पूर्ण खात्री, अजित पवार गटाला कमळाबाईची साथ अन् कमळाबाईचा आशिर्वाद असंच होणार असल्याचं वडेट्टीवारांनी ठामपणे सांगितलं आहे.

Maharashtra Weather Update : ‘या’ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा फटका; हवामान विभागाचा अंदाज

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे एकत्र आल्याचं दिसून आलं. अजितदादा काही दिवसांपासून आजारी असल्याचं कारण देत होते, त्यानंतर अचानक पवार फॅमिली एकत्र आलीयं. त्यानंतर दादांनी लगेचच दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. एकाच दिवशी घडामोडी घडल्याने नेमकं अजितदादांच्या मनात चाललंय तरी काय? हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला.

शरद पवार मराठाच! थेट पुरावा दाखवत ‘OBC’ असल्याचा दावा समर्थकांनी खोडला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. संध्याकाळी लगेचच दिल्लीमध्ये धाव घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गेले काही दिवस अजितदादा डेंग्यूमुळे आजारी होते. मात्र आज धनत्रयोदशीच्या दिवशी ते सार्वजनिक फोटोमध्ये दिसले. अजितदादांनी आपल्या आजच्या कृतीमधून भाजपच्या मनातील गोंधळ दूर करण्याचा तर प्रयत्न केला नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली.

दिवाळीनिमित्त पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन हा सण उत्साहात आणि जोरात साजरा करतात अशी अनेक वर्षांची परंपरा आहे. यानिमित्त पवार कुटुंबियात पुन्हा मनोमिलन तर होणार नाही ना? अशीही शंका अनेकांच्या मनामध्ये येऊन गेली आहे. या शंकेचे निरसन करण्यासाठीच अजित पवारांनी आधीच ‘प्लॅन बी’ आखला होता की काय? असं या भेटीतून दिसून आलं .

शरद पवार यांचे बंधू आणि ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्याकडे पवार कुटुंबाचा आजच्या दिवसातला दिवाळीतील पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. अजितदादा बारामतीत नेहमीप्रमाणे होणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत मात्र, आजच्या पहिल्या कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांनी पवार कुटुंबातील इतर सदस्यांची मने राखली.

दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकांची बरसात सुरु असतानाच आता विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांबद्दल हा दावा केला आहे. वडेट्टीवारांच्या या दाव्यावरुन आता अजित पवारांसह गटातीले नेते नेमकं काय बोलणार?’ हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube