अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर, दिवाळीत बहिण-भावांचं बाँडिंगही दिसले !

दिवाळीत बारामतीत शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे दोघेही एकाच मंचावर आले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी गायिका बेला शेंडेसह इतर कलाकारांबरोबर फोटो काढले.

'शारदोत्सव २०२३' साठी प्रख्यात गायिका बेला शेंडे यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम झाला.

बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात संगीत गाण्यांचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमास बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सुप्रिया सुळे यांनी गाण्यांना चांगलीच दाद दिली.
