Maharashtra Weather Update : ‘या’ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा फटका; हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather Update : सध्या राज्यात अवकाळी पावसाने (Maharashtra Weather Update) हजेरी लावल्याचं चित्र आहे. त्यात आता पुढील 24 तासांत राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शिवाय देशभरातही विविध भागाला या पावसाचा तडाखा बसणार असल्याचं देखील हवामान विभागाने सांगितलं आहे.
Kurla fire : दिवाळीदरम्यान दुर्घटना, कुर्ल्यातील नेहरूनगरच्या इमारतीच्या टेरेसला आग
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशभरामध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांत राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरीही लावली होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर लोकांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Juhi Chawla birthday : …म्हणून सनी देओलच्या ‘या’ चित्रपटात मरता-मरता वाचली होती जुही चावला
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार पुढील 24 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे.
दुसरीकडे राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Rain Alert) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही (Diwali 2023) सुरू आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं (Rain Alert) संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दिवसांत पाऊस होत नाही. पिके काढणीची कामे वेगात सुरू असतात नेमक्या त्याचवेळी अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. आताही हवामान विभागाने आणखी चार दिवस राज्यात अवकाळीचं संकट कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे.