Kurla fire : दिवाळीदरम्यान दुर्घटना, कुर्ल्यातील नेहरूनगरच्या इमारतीच्या टेरेसला आग

Kurla fire : दिवाळीदरम्यान दुर्घटना, कुर्ल्यातील नेहरूनगरच्या इमारतीच्या टेरेसला आग

Kurla fire : दिवाळी दरम्यान मुंबईतील कुर्ला (Kurla fire) परिसरामध्ये नेहरूनगर या इमारतीच्या टेरेसला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळालं. हे अग्नी तांडव दिवाळी निमित्त बांधण्यात आलेल्या मंडपाला आग लागल्याने भडकल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

Juhi Chawla birthday : …म्हणून सनी देओलच्या ‘या’ चित्रपटात मरता-मरता वाचली होती जुही चावला

एका इमारतीच्या टेरेसवर हा मंडप उभारण्यात आला होता. दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान दिवाळीच्या मध्येच ही दुर्घटना घडल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होत. मात्र अग्नीशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.

Horoscope Today: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!

हैदराबादमध्ये केमिकल गोदामाला भीषण आग…

ऐन दिवाळीमध्ये हैदराबादमध्ये एक मोठी दुर्घटना (Hyderabad Fire) घडली आहे. एका केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्यामध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळातच या आगीने इमारतीचा चौथा मजला देखील व्यापला होता.

हैदराबादमधील बाजारघाट येथील नामपल्ली येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये ही दुर्घटना घडली. यादुर्घटनेबद्दल सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. तर 16 किरकोळ जखमी झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube