हैदराबादमध्ये केमिकल गोदामाला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 2 महिला

हैदराबादमध्ये केमिकल गोदामाला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 2 महिला

Hyderabad Fire : ऐन दिवाळीमध्ये हैदराबादमध्ये एक मोठी दुर्घटना (Hyderabad Fire) घडली आहे. एका केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्यामध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळातच या आगीने इमारतीचा चौथा मजला देखील व्यापला होता.

Maratha Reservation आंदोलनात बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्या 181 जणांना बेड्या; ऐन दिवाळीत पोलिसांची कारवाई

हैदराबादमधील बाजारघाट येथील नामपल्ली येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये ही दुर्घटना घडली. यादुर्घटनेबद्दल सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. तर 16 किरकोळ जखमी झाले आहेत.

Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर रिलीज डेट जाहीर

दरम्यान या आगीच्या दुर्घटनेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच संबंधितांना तातडिने उपाययोजना करण्याचे आदेश देखील दिले आहेत. अद्याप देखील या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरूच आहे. 21 जणांना यातून बाहेर काढण्यात आलं होतं. या इमारतीमध्ये हा केमिकल साठा बेकायदेशीर रित्या करण्यात आल्याचं देखील आता समोर आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिस आणि अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी घनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम आणि लोकांना बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. दरम्यान पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. कार रिपेअर करत असताना स्पार्क झाल्याने ही आग लागल्याचं प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube