बीडमध्ये ऐन दिवाळीत पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल 181 जणांना बेड्या; 200 जण रडारवर

बीडमध्ये ऐन दिवाळीत पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल 181 जणांना बेड्या;  200 जण रडारवर

Maratha Reservation : काही दिवसांपूर्वी घडलेल्या जाळपोळींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत पोलिसांनी तब्बल 181 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचं दुसरं उपोषण सुरू असताना बीड जिल्ह्यांत राजकीय नेत्यांची घरं अज्ञातांकडून जाळण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर राज्यातून मोठी टीका झाली होती.

Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर रिलीज डेट जाहीर

त्यावर आता पोलिसांनी आक्रमक भुमिखा घेत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यात ऐन दिवाळीत पोलिसांनी 181 जणांची ओळख पटवून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे या जवळपास 200 आरोपींना पोलिस कोठडी तसेच कारागृहात दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आणखी 200 जणांची ओळख पटविल्याची माहिती समोर आली आहे.

Jhimma 2 Trailer: ‘आई होणं म्हणजे, बाई… ‘; ‘झिम्मा-2’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचं दुसरं उपोषण सुरू असताना 30 आणि 31 ऑक्टोबरला बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यामध्ये राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, बीआरएसचे दिलीप गोरे यांची बीडमध्ये कार्यालये आणि राहती घरं पेटवून देण्यात आली होती.

Tiger 3: भाईजानच्या फॅन्सनी चक्क सिनेमागृहात फटाके फोडत ‘टायगर 3’चे केले स्वागत

तर दुसरीकडे माजलगाव येथे नगरपालिकेसह आमदार प्रकाश सोळुंके, संदीप क्षीरसागर यांच्या राहत्या घरांना आग लावण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडून 307 कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आरोपींची ओळख पटवून आतापर्यंत 181 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून व्हिडीओ आणि सीसीटीव्ही कॅमेरांचा आधार घेतला जात आहे. त्यानंतर ओळख पटल्यावरच या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे. त्याचबरोबर ते कोणत्या समाजाचे आहेत? हे आमच्यासाठी महत्त्वाचं नसून ते आरोपी आहेत. म्हणून त्यांना ताब्यात घेतलं जात असल्याचं या कारवाई दरम्यान पोलिसांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube