Ankita Lokhande: अंकिता लोखंडेचा सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल मोठे भाष्य, म्हणाली..
Ankita Lokhande Sushant Singh Rajput : ‘बिग बॉस’च्या 17 वे (Bigg Boss 17) पर्व दिवसेंदिवस रंजक होत आहे. या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पती विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली आहे. अंकिताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh) डेट केलं होतं. या शोमध्ये अनेकवेळा ती सुशांतबद्दल बोलताना बघायला मिळाले आहे. तिने काही दिवसांपूर्वी सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे.
अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतने ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या सिरोयालच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या सिरीयलच्या सेटवर शूटिंगच्या दरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2016 मध्ये ते विभक्त झाले होते. त्यानंतर 2020 मध्ये सुशांतचं निधन झालं आणि मनोरंजन इंडस्ट्रीसह सर्वांनाच मोठा धक्का बसला.
#AnkitaLokhande ne sari hade par krdi hai.
National telivision p apne husband ko lat marna kitna shi hai?#BB17 #VickyJian #VickyBhaiya pic.twitter.com/Po2RDZELvB
— JagRuk Hindustan (@AskJagruk) November 14, 2023
‘बिग बॉस 17’मध्ये सुशांतबद्दल बोलत असताना अंकिता म्हणाली, ‘सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर मी दीड वर्षे त्याची वाट बघितली आहे. पुन्हा सुशांत आणि माझं नातं अगोदरसारखं होईल असं मला अशा होती. परंतु दीड वर्षांनी 31 जानेवारीच्या दिवशी मी सुशांतला विसरायचा निर्णय घेतला. माझ्या घरी आम्हा दोघांचे एकत्र असलेले फोटो मी आईला काढायला सांगितले. त्यानंतर आईने ते सर्व फोटो फाडून टाकले. खरंतर त्यावेळी मला खूप रडू आले होते.
करणने विचारले दीपिकाला स्पर्धा मानते का? करीनाने थेटच सांगितलं, हा प्रश्न आलियाला…
अंकिता पुढे सांगितले आहे की,”सुशांत सिंह राजपूतची जोपर्यंत मला आठवण येतेय तोपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये दुसरं कोणाची एन्ट्री होणार नाही, असं त्यावेळी मी माझ्या आईला सांगितलं होतं. सुशांतची मी खूप वाट बघितली होती. सुशांतला विसरल्यावर माझ्या आयुष्यात विकी जैनची एन्ट्री झाली. अंकिता लोखंडे आणि विकी जैन डिसेंबर 2021 मध्ये बोहल्यावर चढले होते.
‘बिग बॉस 17’च्या कार्यक्रमामध्ये अंकिताने तिचा ब्रेकअप कसा झाला, याचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीच्या मते एका रात्रीमध्ये त्यांचं नातं पूर्णतः संपलं होत. अभिनेत्री म्हणाली होती, ‘एका रात्रीमध्ये सुशांत माझ्या आयुष्यातून गेला आहे. सुशांत त्याच्या करिअरमध्ये खूप यशस्वी होत होता. नातं संपवताना त्याने त्यामागचं कारण देखील स्पष्ट केलं नाही. मीदेखील त्याचा ब्रेकअपचं कारण विचारण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. परंतु अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 2020 मध्ये मुंबईतील त्याच्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं. ‘बिग बॉस 17’ या कार्यक्रमात आता अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर अभिनेत्रीने पुन्हा पुन्हा सुशांत सिंह राजपूतबद्दल भाष्य केलं आहे.