Download App

उर्फी जावेद प्रकरणी रुपाली पाटलांचा चित्रा वाघांवर हल्लाबोल…

मुंबई : पोलिसांना विचारा ना की, ते कोणत्या कायद्यांतर्गत ते उर्फी जावेदवर कारवाई करणार आहेत. आम्हालाही उर्फीचे कपडे आवडत नाहीत. पण ती एक अभिनेत्री आहे. एक अभिनेत्री म्हणून ती जे काही स्टंट करते त्यावर कायद्याने तो गुन्हा नाही. तुम्ही म्हणाल तो व्याभिचार ठरणार नाही. कायद्यात तशी तरतुद असावी. तुम्ही तीला कपडे जास्त घाल म्हणून सांगितलं असतं तर गोष्ट वेगळी होती.

तसेच तुम्हाला ही गोष्ट इतर महिलांना देखील सांगावी लागेल, दरवेळी भाजप आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं करत. उर्फी जावेद एक मुस्लिम महिला असल्याने तीला विरोध करता का ? कायदा सर्वांसाठी सारखाच असतो मग चित्रा वाघ यांना सर्वांवरच कारवाई करावी लागेल. त्यांनी आपल्यापासून याची सुरूवात केली असती तर हा वादच निर्माण झाला नसता. अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांनी चित्रा वाघांवर केली आहे.

उर्फी जावेद या अभिनेत्रीबद्दल, तिच्या वेशभुषेवरून भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्षेप घात तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाला देखील फैलावर घेतले होते. ‘भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ? भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत जाब का नाही विचारला ? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो… कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ?’ असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Tags

follow us