Rupali Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीही मान्य करण्यता आली. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सत्तेतल्या नेत्यांना वाटतंय की आम्ही घाबरलोयं पण..,; ईडी चौकशीनंतरही रोहित पवारांचा तोरा कायम
भुजबळ हे सरकारमध्ये असून मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना विरोध करत असतील तर भुजबळांच्या कंबरेत लाथा घालून सरकारमधून बाहेर काढा, अशी टीका गायकवाड यांनी केली होती.
गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलतांना रुपाली पाटील म्हणाल्या की, संजय गायवाड याचं शिक्षण कमी असेल. आपण आमदार आहोत, याचंही भान त्यांनी नाही. मुख्यमंत्री शिंदे हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात. तर भुजबळ हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात. मनोज जरांगेंना आरक्षण हे संविधानानुसार मिळेल. त्यांच्या मागण्या कायद्यात बसतात की, नाही ते पाहणं सरकारचं काम आहे. बेकायदेशीर मागण्या असतील तर त्याला आव्हान देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देणार. तर भुजबळांना मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्चाची मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे जे म्हणाले तेच भुजबळ म्हणाले. मात्र, गायकवाड हे कंबरेत लथ घालण्याची भाषा करत आहेत. आम्ही भुजबळ साहेबांसोबत आहोत. आमच्यासोबत सत्तेत असणाऱ्यांना आपली भाषा नीट वापरावी. गायकवाड हा आमदार आहे की, भुरटा चोर आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
सत्तेतल्या नेत्यांना वाटतंय की आम्ही घाबरलोयं पण..,; ईडी चौकशीनंतरही रोहित पवारांचा तोरा कायम
त्या म्हणाल्या, भुजबळ हे कायद्याच्या चौकटीत आणि अभ्यासपूर्ण बोलत आहेत. त्यांच्याविषयी दादागिरीची भाषा वापरू नये. अन्यता त्यांचे कार्यकर्ते तुझे पाय उखडून टाकतील, असा इशारा पाटील यांनी दिला.
पाटील म्हणाल्या, तु आमदार तुझ्या घरी. बोलतांना नीट बोललं पाहिजे. गायकवाड यांना अशी वक्तव्ये करण्यापासून रोखले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे. अन्यथा जशास तसं उत्तर मिळेल. आमचे कार्यकर्ते पाय उखडून टाकायला खंबीर आहेत, असंही पाटील म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीही गायकवाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. संजय गायकवाड यांचे वक्तव्य निंदनीय आहे. त्यांचे विधान चुकीचे आहे. गायकवाड यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण गायकवाडांची भाषा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असं तटकरे म्हणाले.