‘त्या’ महिलेवर मी कोणतीही जबदरस्ती केली नाही – रुपाली पाटील

‘त्या’ महिलेवर मी कोणतीही जबदरस्ती केली नाही – रुपाली पाटील

पुणे : खासदार राहुल शेवाळेंवर आरोप केलेल्या पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे संकेत राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले होते. फेसबुक लाईव्ह करण्यासाठी ‘त्या’ महिलेवर मी कोणतीही जबदरस्ती केली नाही, असे उत्तर रुपाली पाटील यांनी दिले.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील म्हणाल्या, माझ्या विरोधात महिला आयोगाकडे ज्यांनी तक्रार दिली आहे. त्या लोकांना तक्रारी देण्याचा अधिकार असला तरी तक्रार कायद्याच्या चौकटीत बसणारी हवी. पिडित महिलेची मुंबई पोलीसांनी तक्रार घेतली नाही.

त्यामुळे अन्याय झालेला सांगण्यासाठी पिडिता स्वत: हून फेसबुक लाईव्ह आली होती. त्यामुळे जर कोणाला त्या लाईव्हवर आक्षेप घ्यायचा असेत तर तो अधिकार फक्त पिडितेला आहे. इतर कोणीही घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी दिली.

खासदार राहुल शेवाळेंचे समर्थक किंवा कार्यकर्त्यांनी तक्रार केल्या आहेत. फेसबुक लाईव्हमध्ये त्या महिलेला कोठेही पकडून किंवा जबरदस्तीने बसवले नाही. त्यामुळे कोणीही तक्रारी केल्या तरी त्या कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत.

माझ्याकडून काही चुकीचे घडले असेल तर रुपालीताई कारवाई करु शकतात. रुपालीताईंनी अजून कोणतीही नोटीस किंवा पत्र दिले नाही. अशाप्रकारे जर काही नोटीस आली तर मी उत्तर देईल, असे रुपाली पाटील म्हणाल्या.

हिवाळी अधिवेशनात उपसभापती निलमताई गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्याकडे पिडितेचे सर्व पेपर देणार आहे. त्या महिलेच्या संरक्षणाची मागणी करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube