त्यांनी आमचे डोळे उघडले; रोहित पवारांकडून पटेल, तटकरेंच्या नावाच्या उल्लेख, रूपाली ठोंबरेंकडून समर्थन

Rupali Thombare यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेचं समर्थन करत तटकरे आणि पटेलांना देखील सवाल केला आहे

Rupali Thombare

Rupali Thombare

Rupali Thombare Support to Rohit Pawar for Mention of Patel, Tatkare’s name in Ajit Pawar Plain Crash : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. त्यानंतर जो विमान अपघात झाला. त्यावर उलट सुलट चर्चा सामान्य माणूस तसेच राजकीय लोक देखील करत आहेत. खरंच अपघात कसा झाला की घातपात होता? अशा चर्चा असतील किंवा त्या पक्षातील जबाबदार पदाधिकारी असतील हे देखील याबाबत चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटले. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या कुटुंबातील म्हणजे त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील प्रेस घेतली आणि काही प्रश्न उपस्थित केले. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी देखील चौकशीची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेचं समर्थन करत तटकरे आणि पटेलांना देखील सवाल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे?

यावेळी रूपाली ठोंबरेंना त्या अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटल्या त्याबाबत विचारले असता. त्या म्हणाल्या की, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघात होतो त्याच्यामध्ये सीआयडीची चौकशी लावली म्हणत होते. परंतु तपास मार्गावर नव्हता. म्हणजे कुठलीच सत्यता जे म्हणतो आपण पुरावे निशी वास्तव्य हे समोर आलेलं नाहीये.

चंद्रपुरातील उबाठा भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही

त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली. आमदार अमोल मिटकरी भाऊ असतील मी बाबा पाटील इततर कार्यकर्ते यांनी यामध्ये उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. कारण विमान अपघातात झाला. तेव्हा पायलट हे विमान सोलापूरलाही नेऊ शकत होता. पायलट असेल किंवा या यंत्रणेत या काही करू शकत होत्या. त्यामुळे हे संशयास्पद वाटत आहे.

ना संपूर्ण धावपट्टी, ना यंत्रणा; बारामती विमानतळावर नियमांचे उल्लंघन

दरम्यान यावेळी त्यांनी अजित पवारांच्या कुटुंबातील म्हणजे त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील अपघाताबाबत प्रेस घेतली आणि काही प्रश्न उपस्थित केले. त्याचे समर्थन करत तटकरे आणि पटेलांना देखील सवाल केला आहे. त्या म्हणाल्या की, रोहित पवार हे जरी आमदार असले तरी ते अजितदादांचे पुतणे आहेत. त्यांनी सखोल पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे आमचे डोळे उघडले. मला त्यांच्या गोष्टी पटल्या की, ह्रदयाच्या डॉक्टरांची गरज असताना डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवून कसं चालेल? त्यामुळे रोहितदादांनी सांगितल्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताची चौकशी सीआयडीऐवजी फॉरेन एजन्सीकडून करावी. तसेच त्यांनी ही भूमिका घेतली. आजकाल कुणी कुणासाठी काहीही करत नाही. त्यासाठी त्यांचं कौतुक आणि तेच खरे दादांचे पुतणे आहेत.

खासदार निलेश लंके गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला; ‘त्या’ तीन मुद्द्यांवर केली सविस्तर चर्चा

त्याचबरोबर पुढे ठोंबरे म्हणाल्या की, अजितदादांचं मीठ खाल्लेल्या लोकांची ही परीक्षा त्यात सुनेत्रा वहिनींच्या उपमुख्यमंत्री पदासाठी आग्रही राहिलेल्या हिंदुराव, मिटकरी, झिरवळ यांच्या पायावर डोकं ठेवीन. तसेच दादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी प्रफुल भाई अन् तटकरे साहेबांनी बोललं पाहिजे.

Exit mobile version