Sachin Sanap Pune Teachers Constituency Election: पुणे : विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन नवनाथ सानप यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.
“जो मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्याला 2029 मध्ये निवडून द्यायचं नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना शिक्षक-प्राध्यापक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचा विश्वास व्यक्त करत सानप म्हणाले, “2026 हे वर्ष आणि माझा निवडणूक अनुक्रमांक 26 हा माझ्यासाठी शुभ संकेत आहे. 23 ऑक्टोबर रोजी शिक्षक माझ्या नावासमोरील अनुक्रमांक 26 ला प्रथम पसंतीचे मत देऊन मला विजयी करतील.”
निवडणुकीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी शिक्षकांना कोणत्याही अफवा किंवा दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले. “शिक्षक संघटनांची ताकद 27 ऑक्टोबरच्या निकालातून दिसेल,”असा इशारा त्यांनी दिला.
दसऱ्यात झेंडूची फुलं विकली 50 रुपयांना; गेवराईतील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं
महायुतीच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सानप म्हणाले, “माझी उमेदवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाच्या पाठिंब्यावर, शिक्षक संघटनांच्या पाठबळावर उभी आहे. वाढता प्रतिसाद पाहून काहीजण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “महायुतीचे संकेत बाजूला ठेवून एका सामान्य शिक्षकावर विश्वास दाखवत शिंदे साहेबांनी मला पाठिंबा दिला. हा माझ्यासाठी आशीर्वाद असून शिक्षकांच्या भावना ओळखणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाचा पुरावा आहे.”
Mohan Bhagwat : भारताला कमजोर व विभाजित करण्याचे प्रयत्न ; मोहन भागवतांचा मोठा दावा
जुनी पेन्शन योजनेबाबत बोलताना सानप यांनी सर्वसमावेशक अभ्यास करून हा विषय विधान परिषदेत मांडण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच मतदार यादीतील कथित अनियमिततेबाबत तक्रार केल्याचे सांगत निष्पक्ष मतदान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यापूर्वी विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि समताभूमी येथे अभिवादन केले. तसेच शिक्षकांनी निर्भयपणे मतदान करून शिक्षकांच्या स्वाभिमानाच्या लढ्याला साथ द्यावी, असे आवाहन केले.
