Download App

बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड धनंजय मुंडेच, अजितदादा त्यांना संरक्षण का देताय?, संभाजीराजेंचा थेट सवाल

सगळ्याचा मास्टरमाईंड बॉस धनंजय मुंडे आहे. मुंडेंनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, अजित पवार त्यांना संरक्षण का देत आहेत?

  • Written By: Last Updated:

Sambhajiraje Chhatrapati : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण विरोधकांनी उचलून धरलं. या हत्याप्रकरणावरून सातत्याने भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलेच तापलं. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलीये. आता माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मोठी बातमी! 3 नवजात बालकांना HMPV व्हायरसची लागण, सरकारने बोलवली आपत्कालीन बैठक 

या सगळ्याचा मास्टरमाईंड बॉस धनंजय मुंडे आहे. धनंजय मुंडेंनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, असं म्हणत मुंडेंना अजित पवार संरक्षण का देत आहे?, असा सवाल संभाजीराजेंनी केला.

वाल्मिकवर ३०५ कलमांतर्गत कारवाई करा…
संभाजीराजेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही माणुसकीची हत्या आहे. आम्ही सर्व पक्षातील लोक राज्यपालांना भेटत आहोत. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. वाल्मिक कराडवर जे गुन्हे दाखल झालेत, त्यावरून तो सहज बाहेर येऊ शकतो. त्यामुळं त्याच्यावर कलम ३०५ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

पुढं ते म्हणाले, राज्यपालांना सांगू इच्छितो की, या सगळ्याचा मास्टरमाईंड धनंजय मुंडे आहेत. त्यामुळं त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. लोकांचा आक्रोश असतांना अंतुले, आर. आर. पाटील, मनोहर जोशी, अशोक चव्हाण यांनी राजीनामे दिले होते. क्लीन चिट मिळाल्यानंतर ते पुन्हा त्या पदावर बसले होते. मग अजित पवार धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहेत? असा सवालही संभाजीराजेंनी केला.

मराठा विरुद्ध वंजारी हा विषयचं नाही…
राज्यपालांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिलं आहे. ही माणुसकीची हत्या केली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे. आणि अशा गोष्टी महाराष्ट्रात अशा घडत असतील तर हे दुर्दैवं आहे. हा विषय सुध्दा अनेक ठिकाणी जातीच्या मार्गावर गेला आहे. ते सुध्दा होऊ नये. हा मराठा विरुद्ध वंजारी विषय नाही. दलित समाजाच्या मुलाला संतोष देशमुख वाचवायला गेला होता, ही माणुसकीची हत्या आहे, असा संताप संभाजीराजेंनी व्यक्त केला.

follow us