Download App

संभाजीराजे छत्रपतींचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, म्हणाले, ‘आता माझ्यासमोर एकच…’

  • Written By: Last Updated:

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. गाव तिथे शाखा आणि घर तिथं स्वराज्य ही संकल्पना घेऊन संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) महाराष्ट्रात संघटना वाढवत आहे. स्वराज्य संघटनेचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे आज नाशिकमध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक शहरात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. तर आता संभाजीराजे छत्रपती यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, बोर्डवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याबद्दल मी आभारी आहे. पण, बोर्डवर मुख्यमंत्री असं लिहिणं आणि मुख्यमंत्री होणं ह्या दोन्ही गोष्ट वेगळ्या आहेत.

G20 Summit 2023 : जागतिक GDP मध्ये G20 देशाचा वाटा किती? 

ते म्हणाले, माझ्या डोळ्यासमोर सध्या एकच अजेंडा आहे तो म्हणजे स्वराज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. आजची राजकीय परिस्थिती पाहता कोणीही खुश नाही. सत्तेसाठी काहीही सुरू आहे, अशा शब्दात त्यांनी सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मी काल सविस्तर बाजू मांडली. भावना आणि न्याय या दोन्हींचा ताळमेळ कसा साधायचा हे महत्त्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जायचे यावर चर्चा केली पाहिजे. माझ्या दृष्टीकोनातून समस्या सोडवतांना जीवन देखील महत्वाचे आहे.

मराठा समाजातील 49 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे, ते विचार करून निर्णय घेतली. आणि सरकारने देखील आरक्षण देतांना टिकणारे आरक्षण द्यावं, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

 

Tags

follow us