कोल्हापूरचे ( Kolhapur ) संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी आपल्या स्वराज्य संघटनेच्या ( Swarajya Sanghtana ) पदाधिकाऱ्यांच्या नावाची एक जाहीर पोस्ट लिहली आहे. संभाजीराजे यांनी या माध्यमातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली असल्याचे दिसते आहे. त्यांच्या या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये 14 प्रमुख पदाधिकारी व 60 राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांनी राजकारणामध्ये नवा पर्याय म्हणून स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. संभाजीराजे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत असून आपले पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी फेसबूकवर पोस्ट लिहीत याची माहिती दिली आहे. मिशन 2024 साठी स्वराज्याचे प्रमुख शिलेदार म्हणून पुढील पदाधीकाऱ्यांची निवड करण्यात येत आहे. त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व आशिर्वाद! स्वराज्य लक्ष 2024, अशा शब्दात संभाजीराज छत्रपती यांनी पोस्ट लिहली आहे.
यामध्ये 14 प्रमुख पदाधिकारी असून इतर 60 जण राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. या पोस्टमध्ये संभाजीराजे यांनी स्पष्टपणे मिशन 2024 साठी प्रमुख शिलेदार असा उल्लेख करत पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या पुढच्या काळात राज्याच्या राजकारणात संभाजीराजे व त्यांचे शिलेदार स्वराज्यच्या माध्यमातून सक्रीय होणार आहेत हे आता स्पष्ट होत आहे. डॅा. धनंजय जाधव सरचिटणीस व श्री करण गायकर संपर्क प्रमुख तर 6 उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांसह 60 राज्य कार्यकारणी सदस्य जाहीर केले आहेत.