Download App

भाजप-एमआयएम नेत्यांचं गुलूगुलू! आरोप सत्रानंतर काय आहे मनात सांग माझ्या कानात…

श्रीराम नवमीच्या दिवशी घडलेल्या हिंसारानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप केले जात होते. मात्र, आज छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील एका कार्यक्रमात एमआयएम, भाजप, महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या कानात मनातलं सांगत असल्याचं दिसून आलंय. एकमेकांशी दिलखोलून गप्पा मारण्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.

राज्यातील सरकार बिनडोक्याचं, हे फक्त स्वतःसाठी जगतात नाना पटोलेंची सरकारवर टीका

संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अवयवदानाच्या कार्यक्रमात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भाजपचे मंत्री गिरीष महाजन आले होते. या कार्यक्रमादरम्यान तिघेही एकमेकांच्या बाजूला बसल्याचं दिसून आलं. एरवी एकमेकांवर जोरदार टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्योराप करणारे हे नेते कार्यक्रमात मात्र जिवलग मित्रासारख्या गप्पा मारताना दिसून आले आहेत.

‘बाळासाहेबांनी मला मोठं केलं तर, शरद पवार माझ्यासाठी’.. संजय राऊतांचे गौरवोद्गार

जलील यांनी जवळपास दोन ते तीनवेळा अंबादास दानवे यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर दुसरकीकडे जलील यांनी भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांचा सत्कार करताना महाजन यांनी कोपरखळी मारल्याचं दिसून आलं. त्यानंतर गिरीष महाजनांनीदेखील टाळी पुढे करीत जोरदार हास्य पिकवलंय.

पुण्यातील तीन राजकीय नेत्यांना धमकी देणारा एकच… पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

राम नवमीच्या दंगलीनंतर याच नेत्यांनी दंगल यांनी घडवून आणली, त्यांनी घडवून आणली असा सूर लावला होता. आज मात्र, जवजवळ बसून गुलूगुलू गप्पा मारत आहेत? असा सवाल उपस्थितांमध्ये सुरु असल्याचा सूर कानावर आला आहे. विशेष म्हणजे सुरुवातील या तिन्ही नेत्यांना एकाच व्यासपीठावर बसलेलं पाहून प्रत्यक्षदर्शींना आश्चर्याचा धक्काच बसला.

दंगलीनंतर गिरीष महाजनांनी काही लोकं वोट बॅंकेसाठी अशा दंगली घडवून आणत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज एकाच व्यासपीठावर तिघांमध्ये चांगलेच गुळपीठ जमल्याचं दिसून आलंय. या तिन्ही नेत्यामधल्या गप्पा, विनोद पाहून उपस्थितांना धक्काच न बसता तर नवलचं वाटलं आहे.

दरम्यान, एकाच मंचावर बसल्यानंतर इम्तियाज जलील यांनी गिरीष महाजनांसह अंबादास दानवे यांच्यासोबत एकदिलाने मनातल्या गोष्टी सांगितल्याचं चित्र पाहायला मिळालयं. जलील यांनी केलेल्या कानगोष्टी एकदा नाहीतर अनेकदा केल्याचंही दिसलंय. आता तिन्ही नेत्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी झाल्या असतील? हिंसाचारावर बोलताहेत का? की राजकारणाच्या गोष्टी बोलत आहेत? हा प्रश्न संभाजीनगरकरांना पडला आहे.

Tags

follow us