संपदा मुंडे आत्महत्या : रामराजे निंबाळकरांकडे बोट दाखवत रणजितसिंह निंबाळकरांकडून थेट व्हिडीओ कॉल जाहीर

Ranjitsinh Nimbalkar यांची सभा पार पडली.या सभेमध्ये त्यांनी थेट रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत गंभीर आरोप केले.

Untitled Design (9)

Untitled Design (9)

Sampada Munde suicide: Direct video call from Ranjitsinh Nimbalkar, pointing finger at Ramraje Nimbalkar, announced : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. (Phaltan) या प्रकरणात पोलिसांनी (PSI) गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना ताब्यात घेतलं असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहाय्यकावरही मृत डॉक्टरवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशात आज रणजितसिंह निंबाळकरांकडून थेट व्हिडीओ कॉल जाहीर करत रामराजे निंबाळकरांकडे बोट दाखवलं आहे.

काय म्हणाले रणजितसिंह नाईक निंबाळकर?

फलटण येथील महिला डॉक्टरांच्या मृत्यूप्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यात सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत.त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेला असताना फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सभा पार पडली.या सभेमध्ये त्यांनी थेट रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत गंभीर आरोप केले.

सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पाऊस! चक्रीवादळाचा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय?

ते म्हणाले की, खासदारांचा पीए हा या प्रकरणी हिवरे असताना अचानक राजेश शिंदे आणि रोहित नागटिळे या दोघांची नावे या प्रकरणात कशी वोवली गेली याची कॉल हिस्टरी यावेळी रणजीत सिंह यांनी सभेत दाखवली. त्याचबरोबर अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण देत मंत्री जयकुमार गोरे यांचं पद घालवण्यासाठी कशाप्रकारे? एका महिलेचा वापर केला गेला होता.जिच्या सोबत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कॉल रेकॉर्डिंग यावेळी रणजितसिंह यांनी दाखवले.

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांची तब्येत बिघडली; नागपुरमध्ये रुग्णालयात दाखल

त्याचबरोबर रणजीत सिंह म्हणाले की,रामराजे यांनी विरोधकांना मेहबूब शेख,सुषमा अंधारे यांना माझ्याविरुद्ध माहिती पुरवली. हे सर्व माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी आज माफ करतोय.मात्र उद्यापासून आरोप केले तर सोडणार नाही असा इशारा देखील यावेळी रणजितसिंह यांनी दिला.

 

 

Exit mobile version