पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लगेचच कॉंग्रेसने पोटनिवडणुकीविषयी बोलणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. तर वडेट्टीवारांसारख्या नेत्याने हे बोलणं अत्यंत निंदनीय असल्याचं काकडे म्हणाले कारण ते गिरीश बापट यांच्यासोबत अनेक वर्ष सभागृहात एकत्र होते.आपल्या सहकाऱ्याच्या जाण्यनंतर लगेच पोट निवडणुकांबद्दल बोलणे योग्य नाही.
यावेळी पत्रकारांनी काकाडे यांना बापट यांच्या जाण्यानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणुक लागणार का? किंवा यासाठी भाजप काय करणार? असा प्रश्न विचारला त्यावर काकडे म्हणाले की, पक्ष बापच यांच्या जागी योग्य उमोदवार देण्याचा प्रयत्न करेल मात्र त्याआधी बापट यांचे सर्व पक्षांशी संबंध होते त्यामुळे सर्व पक्षांनी विचार करून योग्य निर्णय घ्यावा. तसेच आता दुःखात असला तरी भाजप देखील प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यास समर्थ आहे.
आता सध्या राज्यातील नेत्यांना माझ आवाहन आहे. की, सध्या चार ते पाच दिवस तरी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक यावर कोणी गी काहीही बोलू नका. बापट कुटुंव आणि भाजपला दुःखातून सावरू द्या असं अवाहन देखील यावेळी भाजपचे माजी खासदार संजय काकडे म्हणाले, मात्र यावेळी आता दुःखात असला तरी भाजप देखील प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यास समर्थ आहे. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप पोटनिवडणुकीला सामोरा जाण्यास तयार असल्याचा संकेतच दिला आहे.
Girish Bapat यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार?
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब, कार्यकर्ते आणि पक्ष दुःखातून सावरलेला नाही. त्यात कॉंग्रेसकडून अशी वक्तव्ये केली जात असतील तर कॉंग्रेस महाराष्ट्राला बिहार आणि उत्तर प्रदेश करतीय का? असा प्रश्न निर्माण होतो. तसेच यावेळी पत्रकारांनी काकाडे यांना बापट यांच्यानंतर पुणे भाजपचे नेतृत्त्व कोणाकडे येणार असा प्रश्न विचारला त्यावर काकडे म्हणाले की, याचा निर्णय योग्यवेळी पक्ष घेईल. आता त्यावर बोलणे योग्य नाही.